निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी १६८ खाकी वर्दींची बढती

पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्य पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्य पोलिस दलातील १६८ सहायक निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी बढती दिली आहे. त्यामध्ये नाशिक घटकातील सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पदोन्नतीसह संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

नाशिक पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक विजय पगारे यांची पदोन्नतीने बीबीडीएस नाशिक, महेश गायकवाडांची जळगाव, सदाशिव भडीकरांची नांदेड येथे, नितीन पवार, विनोद तेजाळे यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, अभिजित सोनवणेंची महाराष्ट्र सायबर विभागात बदली करण्यात आली आहे. तर राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांची पदोन्नतीने नाशिक शहर, जळगावचे सुदर्शन वाघमारे, बुलढाण्याचे द्वारकानाथ गोंदके, शंकरसिंग राजपूत, पुण्याचे दीपक जाधव, जालनाचे प्रतापसिंग बहुरे यांची नाशिक ग्रामीण पोलिस दलात नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य पोलिस दलातील ११२ पोलिस उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक घटकातील सोनल फडोळ यांचा समावेश आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादीदेखील तयार करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा:

The post निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी १६८ खाकी वर्दींची बढती appeared first on पुढारी.