पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, माझ्या केबीनमध्ये त्यांचा फोटो : अजित पवार

अजित पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आहे. माझ्या स्वताच्या केबीनमध्ये पवार साहेबांचा फोटो आहे. तुम्ही काळजी करु नका असे अजित पवारांनी म्हटले आहे.

नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम असल्याने त्यासाठी अजित पवार नाशिकमध्ये आले आहेत. कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी अजित पवार बोलत होते. छगन भुजबळ नाशिकमध्ये आले, तुम्हीही नाशिकमध्ये आले तेव्हा स्वागताच्या बॅनरवर शरद पवार यांचे फोटो दिसले त्याविषयी विचारले असता शरद पवार आमचे श्रद्धास्थान असून माझ्या केबीनमध्ये देखील पवार साहेबांचा फोटो आहे. त्याविषयी तुम्ही काही काळजी करु नका असे अजित पवार म्हणाले.

प्रतिभा पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सिल्वर ओकवर गेलो होतो. त्यावेळी पवार साहेब, सुप्रिया सुळे याही तिथे होत्या. राजकारण राजकारणाच्या जागी असते शेवटी परिवार महत्वाचा असतो असे अजित पवार म्हणाले.

उद्या विरोधकांसोबत चहापानाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांनी बहिष्कार न टाकल्यास चर्चा करु, तसेच उद्या आमच्या पक्षाच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. आमचे चार मंत्री सोडले तर बाकीचे सगळे अनुभवी आहेत, त्यामुळे प्रश्नांची उत्तर देणं आम्हाला अवघड नसल्याचे अजित पवार म्हणाले.

शिंदे गटातील आमदारांच्या नाराजी विषयी विचारले असता, या सगळ्या बातम्या मीडियात होत्या. प्रत्यक्षात तसे नाही. आम्ही जनतेच्या कल्यासाठी काम करतो. यात भेदभाव करण्याचे काम नाही. असे अजित पवार म्हणाले.

The post पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, माझ्या केबीनमध्ये त्यांचा फोटो : अजित पवार appeared first on पुढारी.