पाणीप्रश्न सोडवा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू

इंदिरानगर नाशिक www.pudhari.news

इंदिरानगर प्रतिनिधी– वडाळागावातील शंभर फुटी रस्ता लगत असलेले पंडित जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान घरकुल योजना वडाळागाव येथे स्थानिक नागरिकांकडून पाणीपुरवठा विभागाचा निषेध करण्यात आला. मागील दोन महिन्यापासून मनपा घरकुल योजनेतील एकूण नऊ इमारतीतील 720 सदनिकांना फक्त एक तास पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने 3000 हजार लोकांना तसेच घरकुल योजनेतील नागरिकांना पाणीच भेटत नाही. वेळोवेळी तक्रारी करूनही मनपा अधिकारी प्रशासकीय कार्यकाळ असल्यामुळे नागरिकांना जुमानत नाही, म्हणून नागरिकांच्या वतीने हंडा घेऊन निषेध नोंदविण्यात आला. तसेच येत्या दोन दिवसात पाणी प्रश्न सुटला नाही तर लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यावेळी सिंधु पवार, विमल ठोके, अरुणा पालटे, सीमा गायकवाड़, रेखा अडांगळे, विमल गायकवाड़, राही साठे, लाता जाधव, मंगल अहिरे, दिलनाज शेख, फरजाना सय्यद, ज्योती साठे, द्वारका पारखे, शरीफा शेख, रानी तांबे, नीलम पाटोळे, हुदेजा खान, आशामती पालटे, मनीषा काशिद आदी महिला उपस्थित होत्या.

नाशिक शहरातील इंदिरानगर वडाळा भागातील पाणी व्यवस्थापनाची दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त झाले असून पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा लोकसभा मतदानावर बहिष्कार करु असा इशारा महिलांनी दिला.

हेही वाचा-