पाणी प्रश्न पेटला ! आंदोलकांना येवला पोलिसांनी घेतलं ताब्यात

येवला www.pudhari.news

येवला : पुढारी वृत्तसेवा– ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न पेटला आहे. नांदूर मधमेश्वर धरणात जलसमाधी आंदोलनासाठी निघालेल्या वैजापूर येथील महिला, पुरुष शेतकऱ्यांना पोलिसांनी येवल्यात ताब्यात घेतले आहे.

नाशिक जिल्ह्यातील दारणा, भावली, मुकणे आणि भाम धरणातून निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणात नगर आणि निफाड तालुक्यातील गावासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने या पाण्यातून आम्हाला उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळावे यासाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर येथील महिला आणि पुरुष दीडशेहून अधिक शेतकरी आक्रमक झाले आहे. उन्हाळी आवर्तनाची मागणी करूनही पाणी न सोडल्याने नांदूर मधमेश्वर धरणातच जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या या महिला पुरुष शेतकऱ्यांना येवला लासलगाव पोलिसांनी येवला हद्दीतच ताब्यात घेतल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न पेटला आहे.

हेही वाचा –