‘पुढारी’ न्यूज एलईडी व्हॅन, उत्तर महाराष्ट्रभर प्रचार करणार

पुढारी TV ची प्रचार व्हॅन pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
‘पुढारी’ न्यूज चॅनलची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या दृष्टिकोनातून विशेष एलईडी व्हॅनचा प्रवेश उत्तर महाराष्ट्रात झाला. त्याचा औपचारिक शुभारंभ सिन्नर शहरात सोमवारी (दि. १५) सकाळी बसस्थानक परिसरात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

पुढारी TV ची प्रचार व्हॅन pudhari.news

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार सागर मुंदडा, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक यशवंत बाविस्कर, आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर, दराडे, समर्थ ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन संजय चोथवे, सिन्नर सायकलिस्टचे अध्यक्ष अमोल चव्हाणके, माजी अध्यक्ष नितीन जाधव, वनप्रस्थ फाउंडेशनचे दत्ता बोराडे, राजेंद्र क्षत्रिय, डॉ. महावीर खिवसरा, क्रेडाई सिन्नरचे अध्यक्ष समाधान गायकवाड, योगेश लोंढे, एसटी कामगार सेनेचे नेते देवा सांगळे यांच्यासह ‘पुढारी’ नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे आणि युनिटे हेड राजेश पाटील हे उपस्थित होते.

पुढारी TV ची प्रचार व्हॅन pudhari.news

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी 1939 मध्ये स्थापन केलेल्या दैनिक ‘पुढारी’चा पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यासह गोवा आणि बेळगावमध्ये विस्तार झाला. काळाशी सुसंगत बदल घडवत ‘पुढारी’ने वाचकांची खऱ्या अर्थाने भूक भागवली. आज ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या पुढाकाराने ‘पुढारी’ परिवाराने ‘पुढारी’ न्यूज चॅनलच्या माध्यमाने इलेक्ट्रॉनिक मीडियात दमदार पाऊल टाकले. ‘पुढारी’ न्यूज चॅनल अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून, ‘पुढारी’ न्यूजची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही विशेष एलईडी व्हॅन करण्यात आल्याचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुकेश चव्हाणके, ज्ञानेश्वर इलग, शरद इलग, गोरक्षनाथ म्हस्के, अनिल पवार, गजानन जगताप, सचिन सांगळे, अनिल जाधव, श्रद्धा चोथवे, सोनल लहामगे, डॉ. ललित पवार डॉ. विनोद घोलप आदींसह नागरिक उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत ‘पुढारी’ चे वितरण उपव्यवस्थापक शरद धनवटे आणि सिन्नर प्रतिनिधी संदीप भोर यांनी केले.

प्रथम क्रमांकाचे मराठी न्यूज चॅनल होईल
समाजातील अन्याय, अत्याचाराविरोधात चळवळ उभी करणाऱ्या दैनिक ‘पुढारी’प्रमाणे ‘पुढारी’ परिवाराचे ‘पुढारी’ न्युज हे चॅनल राज्यात नंबर एकचे मराठी न्यूज चॅनल ठरेल, असा आशावाद नायब तहसीलदार सागर मुंदडा तसेच आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा:

The post 'पुढारी' न्यूज एलईडी व्हॅन, उत्तर महाराष्ट्रभर प्रचार करणार appeared first on पुढारी.