पोलिसांनी उतरवली थर्टीफस्टची ‘झिंग’

नाशिक पोलिस बंदोबस्त,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी करत केलेल्या कारवाईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३३६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून दोन लाखांचा दंड वसूल केला तर, मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या २२ चालकांविरोधात कारवाई केली आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालय हद्दीमध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाणेनिहाय फिक्स पॉइंट, नाकाबंदी, पेट्रोलिंग करण्यात आलेली होती. तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव, मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून रात्रभर सातत्याने गस्त सुरू होती. परिमंडळ एकमधील आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा, गंगापूर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १५१ टवाळखोर आणि ६३ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली. त्याचप्रमाणे, परिमंडळ दोनमधील अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांसह चुंचाळे पोलिस चौकी या हद्दीत १६३ टवाळखोर आणि ६८ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली. पोलिसांनी वेळीच केलेल्या या कारवाईमुळे नेहमी नववर्षाच्या रात्री रस्त्यावर होणारा धिंगाणा यावेळी झाला नाही.

शहरात असा होता बंदोबस्त

पोलिस उपायुक्त : ३, सहायक आयुक्त – ६, पोलिस निरीक्षक ५९, सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक – ९२, पोलिस अंमलदार – ८८४, होमगार्ड – ५००

बेशिस्तांवरील कारवाई

विनाहेल्मेट – १८९

विनासीटबेल्ट – २४

ट्रिपलसीट – ४७

ब्लॅक फिल्म – ०३

नो-एन्ट्री – १३

सिग्नल जम्प – २४

नो-पार्किंग – १

अन्य उल्लंघन – ३५

एकूण केसेस : ३३६

एकूण दंड : १, ९५,२५० रुपये

ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह – २२

एकूण टवाळखोर : ४४५

हेही वाचा :

The post पोलिसांनी उतरवली थर्टीफस्टची 'झिंग' appeared first on पुढारी.