इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– नाशिक मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना उंबरमाळी जवळ एका भरधाव बल्कर ट्रक चालकाचा बल्कर वरील ताबा सुटल्याने बल्करने पुढे चालणाऱ्या मोटरसायकलला धडक देऊन बल्कर पलटी झाला. पलटी झाल्यावर बल्कर ट्रकने अचानक पेट घेतला. यात बल्कर ट्रक मधील चालक केबिनमध्ये अडकल्याने त्यात त्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
शुक्रवार दि. 3 दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र, कसारा पोलीस, रूट पेट्रोलिंग टीम व मुंबई नाशिक एक्सप्रेस वे च्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी शहापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवून बल्कर ट्रक मधील चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
हेही वाचा –
- धक्कादायक | दारू सोडविण्याचे औषध घेतल्यानंतर एकाचा मृत्यू, व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा
- परभणी: जिंतूर येथे हॉटेल मालक, नोकरांच्या मारहाणीत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; ४ जणांना अटक