भीम जयंती सोन्यावानी.. खणाणते भीमाच्या नाण्यावानी…

जयंती pudhari.news

नाशिक : टीम पुढारी
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा जयंती सोहळा शहर व परिसरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ शनिवारी मध्यरात्री १२ वाजेपासूनच नाशिककरांनी गर्दी केली होती. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर, काँग्रेसच्या शोभा बच्छाव, हेमलता पाटील, आनंद सोनवणे आदी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली होती. तसेच शहर, परिसरातील मंडळे, संस्था, संघटनांनी विविध सामाजिक उपक्रम राबवित जयंती सोहळा उत्साहात साजरा केला.

जयंती Pudhari.news
नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. शालिमार येथील पुतळ्यास नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री शोभा बच्छाव, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आदींनी अभिवादन केले.  (छाया: रुद्र फोटो)

मनसेतर्फे डॉ. आंबेडकरांना अभिवादन
नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, उपजिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, नितीन माळी, संतोष कोरडे, गणेश कोठुळे, अमित गांगुर्डे, राकेश परदेशी, मिलिंद कांबळे, निखिल सर्पदार, प्रफुल बनभेरू, महिला सेना जिल्हाध्यक्षा ज्योती शिंदे आदी उपस्थित होते.

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना मनसे पदाधिकारी.

चर्मकार महासंघातर्फे अभिवादन
नाशिक : शिवाजी रोड येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन घोलप यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी महासंघाचे संपर्कप्रमुख प्रमोद नाथेकर, माजी नगरसेवक सूरज दलोड, ढोर समाजाचे जिल्हाध्यक्ष पिंटू गांधले, विष्णू लोकरे, अजय तसंबड, मोहन पवार, राजा अहिरे, विनोद शेळके, सतीश साबणे आदी उपस्थित होते.

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी.

सगुणा संस्थेतर्फे डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात
नाशिक : सगुणा बहुउद्देशीय संस्था व पी. डी. गांगुर्डे सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शालीमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मातोश्री रमाबाई आंबेडकर मुलींचे वसतीगृह येथील मुलींच्या उपस्थितीत व बौद्धाचार्य महेश पगारे यांनी बुद्ध वंदना घेऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते चरणी पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी श्री समर्थ बँकेचे चेअरमन श्रीपाद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दै. पुढारी निवासी संपादक मिलिंद सजगुरे, नरेंद्र कुलकर्णी, आबासाहेब सोनजे, भालचंद्र जाधव, कुणाल गायकवाड, पी. डी. काळे, शाम जाधव, प्रा. उमेश पठारे, गजु घोडके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पी. डी. काळे यांनी तर दिपक कटारे यांनी आभार मानले.

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना मातोश्री रमाबाई आंबेडकर मुलींचे वसतीगृहाच्या विद्यार्थीनी व सगुणा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी.

भीमयोद्धा युवा फाउंडेशनच्या वतीने अभिवादन
नाशिक : सिडको येथील महाकाली चौकात भीमयोद्धा युवा फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष देवचंद अण्णा केदारे यांच्या हस्ते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी संदीप दोंदे, अर्जुन राजे वेताळ, शंभूराजे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अनिकेत निकम, संदीप मालोणकर, शंकर नाना कंनकुसे, मनोज निकम, सचिन केदारे यांसह भीमसैनिक उपस्थित होते.

नाशिक : डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करताना संदीप दोंदे, अर्जुन राजे वेताळ, शंभूराजे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अनिकेत निकम, संदीप मालोणकर, शंकर नाना कंनकुसे, मनोज निकम, सचिन केदारे यांसह भीमसैनिक.

संभाजी ब्रिगेडच्यातर्फे संविधान वाचन
नाशिक : संभाजी ब्रिगेडच्या वतीने भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी संविधान प्रास्ताविकेचे सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तू स्थळाच्या मंचावर सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी, उपजिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम गोरडे, जिल्हा कार्याध्यक्ष मदन गाडे-पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रवीण हिंगमीरे, जिल्हा सचिव श्रीकांत पगार आदी उपस्थित होते. भारताचे संविधान व लोकशाही संवर्धित करण्यासाठी संभाजी ब्रिगेड सातत्याने प्रयत्नशील राहत विविध कार्यक्रम राबवत आहे.

नाशिक : संविधान प्रास्ताविकेचे वाचन करताना संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी.

The post भीम जयंती सोन्यावानी.. खणाणते भीमाच्या नाण्यावानी... appeared first on पुढारी.