मद्य न दिल्याच्या रागात मित्राच्या आईची दुचाकी पेटवली 

दारू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ‘थर्टी फर्स्ट’ला मद्याची बाटली न दिल्याने एकाने मित्राच्या आईच्या दुचाकीची जाळपोळ केल्याची घटना हिरावाडीतील शक्तीनगर परिसरात घडली. जाळपोळ करणाऱ्यास पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.

राहुल दिनेश वावरे (२०, रा. कोळीवाडा, हिरावाडी) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने एका अल्पवयीन मुलाकडे रविवारी (दि.३१) रात्री मद्याची बाटली मागितली. मात्र, मुलाने त्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त होत राहुलने वाहन जाळण्याची धमकी दिली. दरम्यान, सोमवारी (दि.१) मध्यरात्रीच्या सुमारास संशयिताने अल्पवयीन मुलाच्या पालकाची दुचाकी पेटवून दिली. नागरिकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी आग विझवली. पोलिसांनी तपास करीत राहुलला अटक केली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीनुसार, राहुलविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा :

The post मद्य न दिल्याच्या रागात मित्राच्या आईची दुचाकी पेटवली  appeared first on पुढारी.