चांदवड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा येथे अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला आहे. महामार्गावर बिबट्या जखमी अवस्थेत असून वाहतूक खोळंबली आहे.
वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र बिबट्या जिवंत असल्याने पकडण्यात अडथळे येत आहेत. आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी -सकाळी ही घटना घडली. दरम्यान बिबट्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा :
The post महामार्गावर बिबट्या जखमी अवस्थेत, वाहतुक खोळंबली appeared first on पुढारी.