नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे तसेच खा. संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटाचे अॅड. संदीप गुळवे यांना महाविकास आघाडीतर्फे विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अॅड. गुळवे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव असून शैक्षणिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना ते वैयक्तिकरीत्या ओळखतात. त्यांचा जोमाने प्रचार सुरू झाला असून, ते निश्चितच बाजी मारतील, असा विश्वास ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-