महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकास न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

न्यायालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भरधाव दुचाकी चालवत पादचारी महिलेस धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दिंडोरी रोडवरील वज्रेश्वरी नगर परिसरात घडली होती. यातील वाहन चालक शेहजाद रेहमान खान (रा. विक्रेाळी, मुंबई) यास न्यायालयाने १४ हजार रुपयांचा दंड व २ वर्षे साधा कारावास ही शिक्षा सुनावली आहे.

शेहजाद याने २८ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी भरधाव दुचाकी चालवत पायी जाणाऱ्या वत्सला अशोक बनकर यांना धडक दिली होती. यात वत्सला यांचा मृत्यू झाला होता, तसेच जयवंता प्रधान व सीमा खंडारे या महिला जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. जी. जगदाळे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. एस. एस. चितळकर यांनी युक्तीवाद केला. सुनावणी दरम्यान, डाॅ. अभिषेक दाधीच हे दुबईत होते. त्यामुळे त्यांची व्हीडिओ कॉन्फरसिंगमार्फत साक्ष घेण्यात आली. ही साक्ष सुनावणीत महत्वपूर्ण ठरली. गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा ए. पाटील यांनी शेहजाद यास शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार एम. ए. खंबाईत, महिला शिपाई पी. पी. गोसावी यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

The post महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकास न्यायालयाने सुनावली 'ही' शिक्षा appeared first on पुढारी.