माघार घेऊनही भुजबळांचा दावा कायम, नाशिक मतदारसंघात पुन्हा ट्विस्ट

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : दिल्लीश्वरांनी नाव सूचवून महिना उलटला तरी आपले नाव जाहीर न झाल्याने छगन भुजबळांनी आपण नाशिकमधून उमेदवारी करणार नसून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात होते. मात्र, नाशिक लोकसभा मतदासंघातील महायुतीच्या जागेचा हा घोळ अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. कारण, मी माघार घेतली असली तरी, या जागेवर आमच्या पक्षाचा दावा कायम आहे. आमच्याकडे एकाहून एक सरस असे इच्छूक उमेदवार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. Chhagan Bhujbal

भुजबळांच्या माघारीनंतर शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार हेंमत गोडसे यांनी ठाण्यात पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे गटाला नाशिकची जागा निश्चित झाल्याचे समजले. मात्र भुजबळांनी केलेल्या दाव्यानंतर महायुतीच्या जागेचा तिढा आणखी वाढला आहे. भुजबळ म्हणाले, मी आतापर्यंत फक्त एकदाच तिकीट मागितले आहे. त्यानंतर मात्र, मी कधीच निवडणूकीसाठी आग्रह धरला नाही. पक्षात मला स्वत:हून उमेदवारी मिळत गेली. या निवडणूकीत देखील केंद्रीय नेत्यांनी माझ्या नावाचा आग्रह धरला. मात्र नाव का जाहीर झाले नाही हे मला माहीत नाही.

भुजबळ म्हणाले, भाजप आणि शिंदेंकडे देखील अनेक इच्छुक उमेदवार आहेत. महायुतीचा कार्यकर्ता म्हणून जो कोणी उमेदवार असेल त्याच्या प्रचारासाठी आम्ही काम करणार आहोत असेही भुजबळ म्हणाले. Chhagan Bhujbal

भुजबळांनीच लढावं समता परिषदेत ठराव

दरम्यान, नाशिकची जागा लढविण्यासाठी समता परिषदेने आज नाशिक येथे बैठक बोलवली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी भुजबळांकडे हट्ट धरला आहे. भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदासंघांतून उमेदवारी करावी असा सर्वांचा आग्रह असून तसा ठराव समता परिषदने बैठकीत केला आहे. याबाबत भुजबळ जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य आहे, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा –