माझा कोणालाच पाठिंबा नाही : जरांगे पाटील

Maratha reservation update

सिडको : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला आपण पाठिंबा दिलेला नाही, अशी माहिती मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून पत्रकार परिषदेत दिली.

सकल मराठा समाज नाशिक जिल्हा शाखेने गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा जाहिर केला. याचे पडसाद मराठा समाजात उमटले. यानंतर सायंकाळी समाजाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे विलास पांगारकर, तुषार जगताप, संभाजीनगर येथुन आलेले जरांगे पाटील यांचे समर्थक गणेश उगले पाटील, विजय काकडे पाटील, ज्ञानेश्वर पालखेडे उपस्थित होते.

यावेळी पांगारकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. तरी त्यांचे नाव घेऊन गुरुवारी सकाळी काही जणांनी पत्रकार परिषद घेत परस्पर जाहीर केलेल्या पाठिंब्याच्या कृतीचा आम्ही निषेध करतो. तसेच त्यांनी वंचितलाही पांठिबा दिलेला नाही. पाठिंब्याची परस्पर घोषणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार असल्याचे पांगारकर यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेतूनच पांगारकर यांनी थेट जरांगे यांना भ्रमणध्वणी केला व त्यांनी आपण कोणालाच पांठिबा दिला नसल्याचे सर्वांना सांगितले.

हेही वाचा –