पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यांसाठी मतदान सुरु असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी त्याच्या X अकाउंटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून उतरून येताना दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिकमध्ये येताना पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
‘मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण!’ अशी कॅप्शन देत राऊतांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे. ”नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस…दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे.” असा गंभीर आरोप राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला आहे.
व्हिडिओत नेमकं काय दिसते?
हेलिपॅडवर हेलिकॉप्टरवर उतरलेले दिसते. त्यातून उतरून मुख्यमंत्री शिंदे लोकांना हात करत येताना दिसतात. त्यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक सुटकेस आणि बॅगा घेऊन येत आहेत. नाशिकच्या दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत?, असा सवाल करत राऊत यांनी पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप केला आहे.
चौथ्या टप्प्यातील मतदान
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात (Lok Sabha Elections 2024) सोमवारी (दि.१३) राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
मुख्यमंत्री खाऊ घेऊनआलेतोक्षण!
नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस…
दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहातआहेत?
यातून कोणतामाल नासिकला पोहचला?
निवडणूकआयोग फालतू नाकाबंदीआणि झडत्या करत आहे.महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरुआहे.
@ECISVEEP pic.twitter.com/2gOaPxVeZm— Sanjay Raut (@rautsanjay61) May 13, 2024
हे ही वाचा :