मुख्यमंत्र्याची मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा; ओतूर-जामशेत धरणाची केली पाहणी

कळवण; पुढारी वृत्तसेवा : नाशिकवरून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाल वादळाच्या लॉग मार्चची सरकार दखल घेतली असून मुख्यमंत्र्यानीही मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आहे. यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्याच्या एका शिष्टमंडळाने नाशिकच्या कळवण भागातील आदिवासी तालुक्याला भेट देत शेतकरी, ग्रामस्थ यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. चर्चेनंतर या अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे.

कमिटीने तालुक्यातील अपूर्णावस्थेतील ओतूर धरण, जामशेत धरण आणि सुळे वनजमिनीची पाहणी केली. माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतुत्वाखाली मोर्चेकाऱ्यांनी वन जमिनी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावी, ओतूर धरण व जामशेत धरणाचे दुरुस्ती करावी, गायरान जमिनीवरील घरे नियमित करावी, वनहक्क दावे निकाली काढावे आदी प्रमुख मागण्या केल्या होत्या. गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात कांदा, गहू, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये या मागण्याची लगेच अंमलबजावणी केली जात आहे. कमिटीमध्ये निवासी जिल्हाधिकारी नितीन मुणकर, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी निलेश पाटील, उपअभियंता नितीन अंबडकर, भाऊसाहेब पवार, शिंदे गटाचे जितेंद्र पगार, संदीप वाघ, नितीन खैरनार, विनोद खैरनार, भरत शिंदे, वैभव जाधव, रवी गुंजाळ, बाबाजी जाधव, दादा मोरे, अशोक देशमुख, शांताराम मोरे, शबान पठाण, महावितरण विभाग, वन विभाग, पाठबंधारे विभाग, कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post मुख्यमंत्र्याची मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा; ओतूर-जामशेत धरणाची केली पाहणी appeared first on पुढारी.