
पुढारी ऑनलाइन डेस्क –कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या नाशिकमध्ये आहे. महाराष्ट्रात नंदुरबार येथून सुरु झालेली ही यात्रा क्रमाने धुळे, मालेगाव त्यानंतर आज चांदवड मध्ये येऊन पोहचली आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप, आरएसएस यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
देशात भाजप व आरएसएस ची लोकं आपआपसात द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. जाती-जातीत-धर्मा-धर्मात- दोन भाषांमध्ये, दोन देशांमध्ये द्वेष पसरवून वाद लावण्याचे काम सुरु आहे. मोदींच्या राज्यात फक्त द्वेष (नफरत) पसरवली जात आहे. मग आम्ही ठरवले आहे, “भारत जोडो न्याय यात्रा निकालते है, नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलते है’, म्हणूनच यात्रा काढल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. Rahul Gandhi
या देशात प्रत्येकाला महागाई, बेरोजगारीचा सामना रोजच करावा लागतो आहे. याशिवाय भागीदारी हे नवं संकट मोदींनी उभं केलं आहे. भागीदारी म्हणजे या देशाचा पैसा कोणाच्या खिशात जातो? डीग्री घेऊनही इथल्या तरुणांना रोजगार नाही त्याचे कारण मोदींनी नोटबंदी करुन देशातील छोटे उद्योग संपवले. देशाची सगळी संपत्ती मूठभर लोकांच्या हातात नेवून ठेवली आहे. तेच लोक देश चालवत आहे. देशात सगळ्यात श्रीमंत 22 लोक आहेत, जेवढी संपत्ती 70 करोड भारतीयांकडे आहे तेवढीच त्या 22 लोकांकडे आहे. मोदी देखील त्यांच्याच साठी काम करत आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. (Rahul Gandhi)
इतकच काय तर, युपीएच्या काळात जे गॅस सिलेंडर 400 रुपये होते, ते मोदींना अकराशे रुपयांवर नेऊन पोहचवले. अदानींसारख्या अरब पतींसाठी मोदी काम करत आहे, सर्वसामन्यांशी त्यांना काही -घेणे नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. देशात लोकांना हे कळले आहे, की एकीकडे नफरत आहे. तर दुसरीकडे प्रेम आहे. नफरत को मोहब्बत ही काट सकती है, म्हणून आम्ही यात्रा घेऊन निघालो आहे असे राहुल गांधी म्हणाले. .
शरद पवार, संजय राऊत, राहुल गांधी एकाच मंचावर
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड मध्ये पोहोचली आहे. या ठिकाणी त्यांची भव्य जाहीर सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा :
- Dabholkar Murder Case : एक गोळी भुवईतून डोक्याच्या मागे कशी गेली?
- Maharashtra Politics | सुनेत्रा पवारांचे योगदान विचारता, श्रीकांत शिंदेंचे काय होते? राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- Maharashtra Politics | सुनेत्रा पवारांचे योगदान विचारता, श्रीकांत शिंदेंचे काय होते? राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल
The post मोदींनी 22 लोकांच्या घशात देशाची संपत्ती घातली, राहुल गांधीचा जोरदार निशाणा appeared first on पुढारी.