नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय युवा महोत्सवात रंगणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ठरविलेल्या कार्यक्रम स्थळांमध्ये काही अंशी बदल करण्यात आला आहे. शहरातील ठक्कर डोम येथे होणारे कार्यक्रम आता हनुमान नगर येथील मैदानावर होणार आहेत. ठक्कर डोम येथे कार्यक्रम घेण्यास पुरेशी जागा नसल्याने हा बदल केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील नऊ ठिकाणे निश्चित केली आहेत. तेथील कामाचा प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, हा मुख्य समारंभ तपोवन मैदानावर असलेल्या १६ एकर जागेत होणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवातील स्पर्धा व सांस्कृतिक सादरीकरण शहरातील उदोजी महाराज म्युझियम, कालिदास कलामंदिर, रावसाहेब थोरात हॉल, हनुमान नगर, अंजनेरी, केटीएचएम बोटक्लब, चामरलेणी, विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून कलाकार येथे येणार असून त्यांची कला पाहण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.
अशी आहेत कार्यक्रमांची ठिकाणे
मुख्य उद्घाटन समारंभ तपोवनात
यंग कलाकार शिबिर, पोस्टर मेकिंग, कथालेखन : उदोजी महाराज म्युझियम, गंगापूररोड
सांघिक लोकनृत्य आणि वैयक्तिक लोकनृत्य : कालिदास कलामंदिर
छायाचित्र स्पर्धा : कालिदास कलादालन हॉल क्र. १
उत्स्फूर्त वक्तृत्व आणि संकल्पनाधारित सादरीकरण : कालिदास कलादालन हॉल क्रमांक २
सांघिक लोकगीत आणि वैयक्तिक लोकगीत : रावसाहेब थोरात हॉल, गंगापूर रोड
सुविचार स्पर्धा, युवा संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्र यूथ एक्स्पो, फूड फेस्टिवल : पार्कसाईड नेस्ट शेजारी, हनुमाननगर
साहसी उपक्रम : अंजनेरी, ठक्कर डोम, केटीएचएम बोट क्लब, चामरलेणी
समारोप : पारंपरिक कलाप्रकार उपक्रम : विभागीय क्रीडा संकुल किंवा हनुमाननगर
हेही वाचा :
- …तर तुमचे मराठी म्हणून अस्तित्व संपणार ! : राज ठाकरेंचा इशारा
- Indw vs Ausw : ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी
- राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये येणार लोकपाल!
The post युवा महोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम स्थळ बदलले appeared first on पुढारी.