रमजान ईदनिमित्त वाहतुकीत असा करण्यात आला बदल

ईद वाहतूक पोलीस pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रमजान ईद गुरुवारी (दि. ११) असल्याने त्या पार्श्वभूमीवर भद्रकाली व त्र्यंबकरोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. ईदनिमित्त भद्रकाली परिसरात खरेदीसाठी गर्दी होते, तर त्र्यंबकरोडवरील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठणमुळे गर्दी होणार आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केला आहे.

गुरुवारी सकाळी त्र्यंबकरोडवरील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठाण होणार आहे. तेव्हा त्र्यंबकरोडवर गर्दी उसळते. त्याचप्रमाणे दूध बाजार, चौक मंडई या परिसरात खरेदीचे वातावरण असते. तेव्हा वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे रमजान ईद निमित्ताने गुरुवारी (दि.११) सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काढली आहे.

वाहतुकीसाठी बंद मार्ग असे…
– दूध बाजार चौक ते फाळके रोड टी पॉइंट
– फाळके रोड टी पॉइंट ते चौक मंडई
– चौक मंडई ते महात्मा फुले पोलिस चौकी
– मुंबई नाका सिग्नल ते गडकरी सिग्नल
– सीबीएस सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नल
– भवानी (मायको) सर्कल ते जलतरण तलाव सिग्नल
– बादशाही कॉर्नरकडून दूध बाजारकडे जाणारी वाहतूक जुने भद्रकाली टॅक्सी स्टॅण्डकडून पिंपळ चौक मार्गे त्र्यंबक पोलिस चौकी, गाडगे महाराज पुतळामार्गे इतरत्र
– फाळके रोड टी पॉइंट येथून फुले मार्केट, मौला बाबा दर्गाकडे जाणारी वाहतूक फाळके टी पॉइंट येथून सारडा सर्कल – गंजमाळ – त्र्यंबक चौकी – पिंपळ चौक मार्गे
– फुले चौकातून चौक मंडईकडे जाणारी वाहतूक द्वारका सर्कल, टाळकुटेश्वर मार्गे
– मुंबई नाकाकडून गडकरी चौकाकडे जाणारी वाहतूक संदीप हॉटेलकडून गुरुद्वारा रोड मार्गे
– सीबीएसकडून त्र्यंबक नाकाकडे जाणारी वाहतूक टिळकवाडी सिग्नल मार्गे

बंदोबस्तासाठी असलेले बॅरिकेडिंग पॉइंट
– दूध बाजार चौक
– फाळके रोड टी पॉइंट
– चौक मंडई
– महात्मा फुले चौकी
– जलतरण सिग्नल
– मोडक सिग्नल
– गडकरी सिग्नल
– चांडक सर्कल
– सीबीएस सिग्नल

हेही वाचा:

The post रमजान ईदनिमित्त वाहतुकीत असा करण्यात आला बदल appeared first on पुढारी.