राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या श्रावणीला सांगळेला रौप्यपदक

श्रावणी सांगळे www.pudhari.news

नाशिक : तिरूअन्नामलाई (तामिळनाडू) येथे पार पडलेल्या २१ व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या २० वर्षांखालील वयोगटात नाशिकच्या श्रावणी सांगळे हिने ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अंतिम सामन्यात वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगालच्या मातब्बर खेळाडूंना मागे टाकत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिले. श्रावणी ही त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकॅडमीच्या ॲथलेटिक्स मैदानावर व्हीडीके स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळ-सायंकाळ सराव करते. तिने आतापर्यंत १० राष्ट्रीय पदकांची कमाई केली आहे. श्रावणीचे महाराष्ट्र पोलिस अकॅडमीचे उपसंचालक डॉ. शिवाजी पवार, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सेक्रेटरी सुनील तावरगिरी, प्रशिक्षक संदीप फुगट, बालाजी शिरफुले, ज्योती काळे आदींनी कौतुक केले.

हेही वाचा:

The post राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या श्रावणीला सांगळेला रौप्यपदक appeared first on पुढारी.