राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महाराष्ट्रात; त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतले दर्शन

Rahul Gandhi

पुढारी ऑनलाईन डेस्क: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत न्याय जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात आहे. दरम्यान त्यांची ही यात्रा आज (दि.१४) नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे पोहचली आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करत दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. या संदर्भातील व्हिडिओ वृत्त ‘ANI’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Rahul Gandhi)

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दाखल होत प्रार्थना केली. (Rahul Gandhi)

Rahul Gandhi: नाशिक नगरीत जोरदार स्वागत

काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये पोहचली आहे. या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. नाशिकमध्ये शालिमार चौकात त्यांची सभा व रोड शो होणार आहे. दरम्यान आघाडीच्या तीनही पक्षांच्या वतीने त्यांचे नाशिक नगरीत जोरदार स्वागत करण्यात आले आहे.  (Rahul Gandhi)

हेही वाचा:

The post राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' महाराष्ट्रात; त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतले दर्शन appeared first on पुढारी.