वनरक्षकासाठी पहिल्या दिवशी १६०० उमेदवारांची पात्रता चाचणी

वनरक्षक भरती www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक विभागातील वनवृत्तामधील वनरक्षकांच्या रिक्त जागांसाठी शुक्रवारपासून (दि. १९) शाररीक पात्रता व कागदपत्रांच्या तपासणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी १६०० ऊमेदवारांनी त्या साठी उपस्थिती लावली. येत्या २३ तारखेपर्यंत ही प्रक्रीया चालणार आहे. (Nashik Forest Guard Recruitment)

नाशिक विभागातील वनरक्षकाच्या ९९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये लेखी परिक्षा घेण्यात आली. त्यामध्ये १३ हजार ९५२ उमेदवार पात्र ठरले. या पात्र उमेदवारांची आता शाररीक पात्रता तसेच कागदपत्रांची पडताळणी प्रक्रीया घेतली जात आहे. वन विभागाच्या गडकरी चौकातील मुख्य वनरक्षक कार्यालयात ही प्रकीया पार पडते आहे. पहिल्याच दिवशी दोन हजार ऊमेदवारांना पडताळणीसाठी बोलविले होते. त्यापैकी १६०० ऊमेदवारांनी उपस्थिती लावली. तर ४०० उमेदवारांनी दांडी मारली. दरम्यान, शनिवार (दि. २०) पासून दररोज तीन हजार ऊमेदवारांना वनविभागाकडून पडताळणीकरीता उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सीसीटीव्हीची नजर (Nashik Forest Guard Recruitment)

वनरक्षक भरती प्रक्रीया पारदर्शक पार पाडण्यासाठी ३० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त कागदपत्रांच्या तपासणीसाठी नाशिक व नगर जिल्ह्यातील प्रादेशिक वन्यजीव, सामाजिक वनविभागाच्या शाखांमधील प्रत्येकी २५ लिपीक व लेखापाल तैनात करण्यात आले आहे. तर शाररीक चाचणीसाठी दोन्ही जिल्ह्यातून प्रत्येकी १३ वनपाल व वनक्षेत्रापालांची नियुक्ती केली गेली आहे.

हेही वाचा :

The post वनरक्षकासाठी पहिल्या दिवशी १६०० उमेदवारांची पात्रता चाचणी appeared first on पुढारी.