वाॅशिंग मशिनमधून सोन्याचे दागिने लंपास

सोने

नाशिक : घरातील वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले १ लाख ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले. इंदिरानगर येथील चार्वाक चौक येथे १८ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान ही चोरी झाली. योगेश बाेरसे (४७) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्याकडील सुमारे ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएम मधून बॅटरी लंपास

नाशिक : पंचवटीतील टकले नगर परिसरातील बँकेच्या एटीएम केंद्रातून चोरट्याने २५ हजार रुपयांच्या सहा बॅटरी लंपास केल्या आहेत. चंदनकुमार मिश्रा (३५, रा. पिंपळगाव बसवंत) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ५ ते ६ मे दरम्यान बँक ॉफ महाराष्ट्र बँकेच्या एटीएम केंद्रातून बॅटरी चोरल्या. चोरट्याने तेथील सीसीटीव्हीची वायर तोडून चोरी केली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंजमाळला साेन्याचे दागिने लंपास

नाशिक : गंजमाळ परिसरात दोघांनी मिळून घरात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दीपक किसन निकाळजे (४९, रा. गंजमाळ) यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित प्रिती निकाळजे व शादाब शेख यांच्याविरोधात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. दोघा संशयितांनी १५ एप्रिलला सकाळी आठच्या सुमारास घरातील कपाटात ठेवलेले ३७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.

लॅपटॉप, वेब कॅमेरा लंपास

नाशिक : घराचा दरवाजा उघडून चोरट्याने २० हजार रुपयांचा लॅपटॉप व वेब कॅमेरा चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील माणिक नगर परिसरात घडली. विनीत भोसले (२२, रा. माणिक नगर, मुळ रा. सोलापूर) याच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने सोमवारी (दि.६) सकाळी सात ते नऊच्या सुमारास चोरी केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.

पिंपळगाव बहुल्याला घरफाेडी

नाशिक : पिंपळगाव बहुला येथील भावले मळा परिसरात चोरट्याने घरफोडी करून ५० हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने व रोकड चोरून नेली. गणेश भावले (३६) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ५ ते ६ मे दरम्यान, घरफोडी करून घरातील २५ हजार रुपयांची रोकड व २५ हजार रुपयांचे दागिने चोरले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –