शरद पवार उद्या नाशिकच्या दौ-यावर; महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे अधिवेशनला उपस्थिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे त्रैवार्षिक अधिवेशन शुक्रवारी (दि.10) गोल्फ क्लब मैदानावर दुपारी साडेबाराला होणार आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून किसान सभेचे महासचिव कॉ. अतुलकुमार अंजान व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार सिंघल उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात वीज उद्योगातील घडामोडींवर चर्चा करून केंद्र व राज्य सरकार यांचे कामगार विरोधी असलेले धोरण, संसदेमध्ये कामगार कायद्यातुन कष्टकरी वर्गाला शाश्वत रोजगार हिरावून घेणार्‍या कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. नव्या कायद्यामुळे श्रमजीवी वर्गाची वाटचाल पुन्हा गुलामगिरीकडे होणार आहे. स्पर्धेच्या नावाखाली 70 हजार कोटी रुपयांची पायाभूत सुविधा कवडीमोल भावाने भांडवलदारांना हस्तांतरित करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप कॉ. शर्मा यांनी सांगितले. सरकारने घेतलेल्या या भूमिकेच्या विरोधात अधिवेशनात महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवशेनात ठराव मांडण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत आयटकचे राज्य सचिव राजू देसले, वीज कामगार नेते व जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, कॉ. पंडितराव कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये होणारे कार्यक्रम असे….
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी (ता. १०) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईहून हेलिकॉप्टरने त्यांचे गोल्फ क्लब मैदानावर सकाळी पावणेअकराला आगमन होईल. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये दोन आणि दिंडोरीला एक, असे तीन कार्यक्रम होतील. रात्री ते नाशिकमध्ये मुक्कामी थांबणार आहेत. सकाळी 11.30 वाजता गोल्फ क्लब मैदानावर होणाऱ्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहतील. दुपारी 2.30 वाजता महाकवी कालिदास कलामंदिरातील मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या नागरी सत्काराला उपस्थित राहतील. दुपारी 4  वाजता मातेरेवाडी (ता. दिंडोरी) येथे कादवा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर हॉटेल एमरॉल्ड पार्कमध्ये मुक्कामी थांबतणार आहेत. त्यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळही उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा:

The post शरद पवार उद्या नाशिकच्या दौ-यावर; महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे अधिवेशनला उपस्थिती appeared first on पुढारी.