शिकवणीच्या बहाण्याचे गुंगीचे औषध पाजले, अत्याचाराचे शुटींगही केले

अत्याचार pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शिकवणीतील राजस्थानमधील शिक्षकाने (मेंटॉर) २० वर्षीय तरुणीसमवेत ओळख करीत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीनुसार, संशयिताने गुंगीचे औषध पाजून अत्याचार करीत त्याची चित्रफीत तयार केली. त्यानंतर चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात विवेक याेगनारायण बाेहरा (रा. राजस्थान) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिता शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. तिने अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑनलाइन शिकवणी सुरू केली होती. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शिकवत असताना संशयित विवेकने पीडितेसोबत ओळख वाढवली. त्यांच्यात मैत्री वाढल्यानंतर काही दिवसांपूर्वी विवेक राजस्थानहून नाशिकमध्ये आला. दाेघे मुंबई, साेमेश्वर, पुणे, गुजरात आदी ठिकाणी फिरायला गेले. त्यानंतर नाशिकमध्ये आले असता, संशयित विवेकने पीडितेच्या घरात असताना शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिला पाजले. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार करीत त्याची चित्रफीत केली. त्यानंतर विवेकने पीडितेचे अश्लिल व्हिडीओ व्हाॅट्सअपवर टाकून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता घाबरली. तिने तातडीने ही बाब पालकांना व पोलिसांना सांगितली. म्हसरुळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली आहे. पाेलिस उपनिरीक्षक उद्धव हाके यांनी माेबाइल लाेकेशन व अन्य तांत्रिक विश्लेषणांद्वारे तपास सुरू केला आहे. यातील संशयित हा उच्चशिक्षित असल्याचा अंदाज पोलिसांना आहे.

हेही वाचा:

The post शिकवणीच्या बहाण्याचे गुंगीचे औषध पाजले, अत्याचाराचे शुटींगही केले appeared first on पुढारी.