नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी (दि. ६) तीन उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन भरणाऱ्यांमध्ये टीडीएफ जुनी पेन्शन संघटनेचे राजेंद्र निकम यांच्यासह अपक्ष दिलीप डोंगरे व अमृतराव शिंदे यांचा समावेश आहे. दरम्यान निवडणुकीत अर्ज भरण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (दि. ७) आहे.
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. त्यामध्ये गुरूवारी तीन जणांनी अर्ज दाखल केले, तर दिवसभरात 13 अर्जांची विक्री झाली. नाशिक विभागातून शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी यंदा इच्छुकांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत एकूण २२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये विद्यमान आमदार किशोर दराडे, नगरचे विवेक कोल्हे, राजेंद्र विखे-पाटील, निशांत रंधे, महेंद्र भावसार, दत्तात्रय पानसरे यांच्यासह अन्य प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत शुक्रवारी (दि. ७) आहे. महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे हे नामनिर्देशन पत्र सादर करणार आहेत.
हेही वाचा-