सिडको : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याचे आक्षेपार्ह वक्तव्य केले. हे प्रक्षोभक व बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे. या संदर्भात राऊत यांच्या विरोधात आंबड पोलीस ठाण्यात भाजप पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदिप पेशकार यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानावर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे. अशा आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचे पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान निष्पक्ष निवडणुकांच्या तत्वाच्या विरोधात आहे हे उघड आहे. या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे. संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवितास धोका आहे. हे स्पष्ट होत असल्याच्या तक्रारीत पेशकार यांनी म्हटले आहे. अशा विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते. निवडणूक आयोगाला आणि सबंधित अधिकारी यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा प्रक्षोभक भाषणांची पुनरावृती होणार नाही. याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशा आशयाचे तक्रारअर्ज अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना दिले आहे. यावेळी प्रदिप पेशकार, जगन पाटील, अविनाश पाटील, रविन्द्र पाटील, प्रविण मोरे, प्रकाश चकोर, यशवंत नेरकर, डोंगरसिंग रजपूत, दिनेश मोडक आदी उपस्थित होते.
The post संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात अंबड पोलिसात तक्रार appeared first on पुढारी.