सलाम तुमच्या कार्याला; पशुपक्षांची तहान भागवण्या राबताय भर उन्हात

पुढारी ऑनलाइन : वाढत्या उष्णतेत नैसर्गिक घाट माथ्यावर यंदा पिण्याच्या पाण्याची वाणवा झाली आहे. अश्यात वनातील वन्यजीव प्राणी दिवसांगणिक विस्तापित होत आहे. अश्या जंगल घाटातील तहानलेल्या वन्यजीव पक्षांची तहान भागावी म्हणून नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या १९३ व्या मोहिमेत वाघेरा-हरसूल घाटात  श्रमदानातून ४ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या मोहिमेत भर उन्हात पर्यावरण मित्र व दुर्गसंवर्धक यांनी दिवसभर श्रमदान केले. पुढील मोहीम आंबोली घाटात घेतली जाणार असल्याची माहिती यावेळी दुर्ग व जल अभ्यासक राम खुर्दळ यांनी यावेळी दिली आहे. तहानलेल्या पशुपक्षांसाठी भर उन्हात राबणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या सर्वच हातांना खरोबर सलाम आहे.

यंदा नाशिक जिल्ह्यात प्रजन्यमान कमालीचे घटले आहे. त्यात वनवे लागण्याची नैसर्गिक संकटे बेसुमार वाढली आहे. अशात आपला अधिवास असलेल्या वनांमध्ये अनेक दुर्मिळ झाडे, पक्षी वन्यजीव कमालीचे कमी झाले आहे. बरेच वन्यजीव तर दिसेनासे झाले आहेत. नाशिकच्या वाघेरा-हरसूल पश्चिम घाटात जिथे वनराई शिल्लक होती तिथे ही वनवे व लाकूड तोंडी मुळं घाट ओसाड होण्याच्या स्थितीत आहे. अश्यात उरले सुरले नैसर्गिक झाडे, वन्यजीव, पक्षी व जैवविविधता जपण्यासाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र शासन, प्रशासन, वण व पर्यावरण खाते याबाबतीत सक्षम नसून मनुष्य बळ कमी ही त्यांची कायमच ओरड असल्याने जंगल घाट रामभरोसे आहेत. या दृष्टीने वनव्याची दहाकता कमी व्हावी म्हणून जाळपट्टे उभारणे, जंगलात वनवा लावणारे गजाआड करणे, वनव्यात लाकूड तोडीमूळ होणारे नैसर्गिक नुकसानीचे ऑडिट करणे या कामी मात्र वण पर्यावरण विभागाचे अजूनही गांभीर्य दिसत नसल्याने जंगल घाटात नैसर्गिक घळीत पाणवठे ही ओसाड उध्वस्त स्थितीत आहे. त्याकामी व्यापक मोहीम हाती घ्यावी म्हणून दरवर्षी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, दरवर्षी पाणवठे निर्माणबद्दल श्रमदानं करीत असते. त्याच दृष्टीने वाघेरा-हरसूल घाटात पानवठे निर्माण करण्याचा पहिला टप्पा शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने केला.

दरम्यान हरसूल-वाघेरा घाटात मद्यपिंच्या कायमच वावर असल्याने घाटात प्लास्टिक कचरा व दारूच्या रिकाम्या फुटलेल्या बाटल्या अधिक आहेत. त्या पर्यावरणास घातक आहेत. त्याला आवर घालनार कधी? असा सवाल पर्यावरण साहित्यिक देवचंद महाले यांनी केली आहे. या मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, दरी माता पर्यावरणचे भारत पिंगळे, वृक्ष अभ्यासक शिवाजी भाऊ धोंडगे, निसर्ग साहित्यिक देवचंद महाले, वृक्षमित्र जितेंद्र साठे, शिवकार्यचे विश्वस्त किरण दांडगे या मोहिमेत राबले.

हेही वाचा :

The post सलाम तुमच्या कार्याला; पशुपक्षांची तहान भागवण्या राबताय भर उन्हात appeared first on पुढारी.