सिडको : पुढारी वृत्तसेवा- उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ट्रकच्या खाली बसलेल्या युवकाच्या अंगावरून ट्रकचे टायर गेल्याने जागीच ठार झाल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीत घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, दुपारी साडेतीनच्या सुमारास अंबड एमआयडीसीतील राज ट्रान्स्पोर्ट या ठिकाणी एक ट्रक उभा होता. यावेळी ऊन असल्याने कृष्णा मुरलीधर जगताप (वय ३८) हा सावलीसाठी थेट ट्रकच्या बाजूला जाऊन बसला होता. ट्रकचालक चंदनसिंग दशरथसिंग कनाडिया (४३) याला याबाबत काहीही कल्पना नव्हती. त्याने ट्रक चालू करून तो पुढे नेताच ट्रकच्या बाजूला बसलेल्या कृष्णा मुरलीधर जगताप (वय ३८) यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चुंचाळे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडेंसह अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सुनील जगताप यांच्या फिर्यादीवरून चालक कनाडिया याच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- Lok Sabha Election 2024 | होऊ दे खर्च..! पण 95 लाखाच्या आत, लोकसभा निवडणुकीत प्रचार खर्चाला मर्यादा
- Crime News : अंजनेरी शिवारात नाशिकच्या वाहनचालकाचा 6 लाखांचा ऐवज लुटला
- Lok Sabha Election : उत्तर प्रदेशात मुस्लिम मतांच्या विभाजनामुळे भाजपला फायदा
The post सावलीसाठी ट्रकचा आडोसा जीवावर बेतला, चाकाखाली दबून युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.