सिन्नर मतदार संघात 69.50 टक्के मतदान

मतदान

सिन्नर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- सिन्नर तालुक्यात 69.50 टक्के मतदान झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिली.

नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने सिन्नर मतदार संघातील मतदारांमध्ये उत्स्फूर्तता दिसून येत होती. त्यामुळे दर वेळच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढेल असा अंदाज होता. तो आता खरा ठरला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघात 60 ते 62 टक्के पर्यंत मतदान झाल्याचा इतिहास आहे. मात्र यंदा मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. त्यावरूनच मतदानाचा टक्का वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

काल निवडणूक शाखेने अंदाजे 67.46 टक्के मतदान झाल्याची माहिती दिली होती. तथापि झालेल्या मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली. त्यात पुरुष 72.8%, स्त्री 65.84% असे एकूण 69.50% मतदान झाले आहे.

हेही वाचा –