नाशिक : पुढारी वृत्तसेवा- व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या महाराष्ट्र राज्य सीईटी सेलच्या वतीने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यासाठी अर्ज नोंदणीला १६ जानेवारीपासून सुरुवात होत असून, या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना आत्तापासून परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पूर्व परीक्षा ही सीईटी सेलच्या वतीने घेण्यात येते. (CET Exam)
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रम आणि एलएलबी, एमसीए अभ्यासक्रमांसाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अभियांत्रिकीसाठीची सीईटी २५ ते ३० एप्रिलदरम्यान होणार आहे. तर औषधनिर्माणशास्त्रसाठीची सीईटी १६ ते २३ एप्रिलदरम्यान होणार आहे. बी.एड, एम.एड (तीन वर्षांचा इंटिग्रेटेड), एम. एड, एम.पी.एड, बीपीएड, बी.एड. (जनरल आणि स्पेशल) आणि बीएड ईएलसीटी, एलएलबी (तीन वर्षे), बीए-बीएस्सी व बी.एड, एमबीए, एमएमएस, एम.एम.आर्क, एम.एच.एमसीटी, एमसीए, बी. डिझाईन, बी. एचएमसीटी या सीईटीकरिता नोंदणी सुरू झाली आहे. १६ जानेवारीपासून एमएचटी सीईटीकरिता नोंदणी सुरू होईल, तर १८ जानेवारीपासून एलएलबी (पाच वर्षे) सीईटीकरिता नोंदणी सुरू होईल. (CET Exam)
दरम्यान, सीईटी सेलच्या वतीने पदवी आणि पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. एकूण १६ प्रकारच्या प्रवेशपूर्व परीक्षांचे हे वेळापत्रक असून, विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जाणून घेण्यासाठी तसेच अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी https://cetcell.mahacet.org/ या सीईटी सेलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अशा असतील परीक्षा (CET Exam)
– बी.एड, एम.एड (तीन वर्षाचा इंटिग्रेटेड) आणि एम.एड : २ मार्च
– एम.पी.एड : ३ मार्च
– बी.एड (जनरल आणि स्पेशल) आणि बी.एड ईएलसीटी : ४ ते ६ मार्च
– बी.पी.एड : ७ मार्च
– एमबीए आणि एमएमएस : ९ आणि १० मार्च
– एम-एचएमसीटी आणि एम. आर्किटेक्चर : ११ मार्च
– एलएलबी (तीन वर्षे) : १२ आणि १३ मार्च
– एमसीए : १४ मार्च
-बी डिझाईन : ६ एप्रिल
– बी एचएमसीटी सीईटी : १३ एप्रिल
– एमएचटी सीईटी (पीसीबी) : १६ ते २३ एप्रिल
-एमएचटी सीईटी (पीसीएम) : २५ ते ३० एप्रिल
– एलएलबी (पाच वर्षे) : ३ मे
हेही वाचा :
- बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी : आम्ही जगायचं कसं?; नागरीकांचा सवाल
- Jalgaon News : लाखो मातीच्या दिव्यांपासून साकारली रामलल्लाची भव्य मूर्ती, पाहण्यासाठी लोटला जनसागर
- Pakistan-Iran border tensions | आता पाकचा इराणवर एअरस्ट्राईक, अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा
The post सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर appeared first on पुढारी.