हरसूल वनपरिक्षेत्रात खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त

खैर लाकडाची तस्करी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-हरसूल येथील आडगाव ते टोकपाडा रस्त्यावर खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारे आयशर वाहन (एमचएच ०४, डीएस ५७००) वनविभागाने जप्त केले. पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. ६) मध्यरात्रीनंतर ३ वाजता सापळा रचून ही कारवाई केली.

पथकाने वाहन अडविले असता, चालकाने कर्मचाऱ्यांंवर वाहन नेण्याच्या प्रयत्नात वाहन रस्त्यालगतच्या चारीत गेले. या गडबडीत अंधाराचा फायदा घेत वाहनचालक व इतर फरार झाले. वाहनात सहा हजार ४०० रुपये किमतीचे खैराचे ३६ नग मिळून आले. वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास सोनवणे, वनपाल अमित साळवे, सुनील टोंगारे, पद्माकर नाईक, वनरक्षक गजानन कळंबे, मनोहर भोये व वाहनचालक संजय भगरे यांनी ही कारवाई केल्याचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post हरसूल वनपरिक्षेत्रात खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त appeared first on पुढारी.