हृदयद्रावक घटना ! निफाडला शेततळ्यात पडून दोन बालकांचा मृत्यू

निफाड ( जि.नाशिक ) ऑनलाईन डेस्क : येथे शेततळ्यात पडून दोन चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घराजवळील शेत तळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून या शाळकरी मुलांचे नाव प्रेम गोकुळ ठेपले ( 15 ) आणि प्रतिक गोकुळ ठेपले (13 ) आहे.

नुकताच शाळेचा निकाल लागल्याने घरात मुलांच्या पुढील शिक्षणाची तजवीज सुरु होती. शाळेचे दफ्तर, गणवेश अणायचा. अशी आनंदाची चर्चा सुरु असताना घरात झालेल्या शोकाकुल घटनेने गोपाळ जयराम ढेपले कुटुंब एकाएकी सुन्न झाले आहे.
तर पुढील तपास सुरु आहे.