आरटीई प्रवेशासाठी आज अखेरची मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीईच्या दुसऱ्या प्रतीक्षा यादीची मुदत शुक्रवारी (दि. ७) संपणार आहे. राज्यात ८० हजार १४९ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून, २१ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत.

राज्यात आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के राखीव जागांसाठी फेब्रुवारी २०२३ पासून प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्‍यातील आठ हजार ८२३ खासगी शाळांमधील एक लाख एक हजार ८४६ जागांसाठी तीन लाख ६४ हजार ४१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. सोडतीत निवड झालेल्या ६४ हजार ८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर पहिल्या प्रतीक्षा यादीतील १३ हजार ७०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पालकांच्या अल्प प्रतिसादामुळे दुसऱ्या प्रतीक्षा यादीच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केले होते.

दुसऱ्या प्रतीक्षा यादीत आठ हजार ८२६ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. गुरुवारी (दि.६) सायंकाळपर्यंत दोन हजार ३९६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्यापही २१ हजार ६९७ जागा रिक्त आहे. त्यामुळे या जागांसाठी राज्य शासन काय निर्णय घेणार? हे बघणे औचित्याचे ठरणार आहे.

राज्यातील आरटीई प्रवेशाची स्थिती

फेरी-निवड-प्रवेश

लॉटरी- ९४,७०० – ६४,०८९

प्रतीक्षा यादी (१) – ८१,१२९ – १३,७०९

प्रतीक्षा यादी (२) – ८,८२६ – २,३९६

हेही वाचा : 

The post आरटीई प्रवेशासाठी आज अखेरची मुदत appeared first on पुढारी.