खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान जळगावात थांबविले

जळगाव : राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानाने धुळे जिल्ह्याकडे जात होते. मात्र ऐनवेळी खराब हवामानामुळे त्यांचे विमान जळगावात उतरवण्यात आले आहे. जळगावातून रस्ते मार्गाने मुख्यमंत्री धुळ्याकडे रवाना झाले आहेत. (Eknath Shinde Dhule)

धुळे जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन (Eknath Shinde Dhule) करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्यासाठी धुळ्याकडे निघाले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे धुळे विमानतळावरून सिग्नल न मिळाल्यामुळे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजित पवार यांना जळगाव विमानतळावर उतरावे लागले आहे. येथून त्यांना रस्ते मार्गाने धुळ्याकडे जावे लागले, त्यामुळे त्यांचा नियोजित कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी विलंब झाला आहे.

The post खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान जळगावात थांबविले appeared first on पुढारी.