ग्रामपंचायत निवडणूका : कुठे सरळ तर कुठे बहुरंगी लढत

ग्रामपंचायत www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

ठाणगाव :  शर्यतीत सहा उमेदवार मैदानात 
ठाणगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गाकडे खुले असून सरपंचपदासाठी बहुरंगी लढत रंगणार आहे. त्यात अशोक काकड, रामदास भोर, शिवाजी शिंदे, अशोक शिंदे, नामदेव शिंदे व प्रतीक शिंदे या सहा उमेदवारांचा समावेश आहे. प्रभाग क्र. 1 मध्ये अनु. जातीच्या स्त्रीकरिता राखीव जागेवर मनीषा आव्हाड व कामिनी जगताप, ओबीसी स्त्रीकरिता राखीव जागेवर अलकाबाई शिंदे व शोभा शिंदे, सर्वसाधारण जागेकरिता मदन शिंदे व शांताराम शिंदे अशी लढत होईल. प्रभाग क्र. 2 मध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव जागेवर संगीता कातोरे, रूपाली भोर, मुनाबाई मेंगाळ, मनीषा सोंगाळ, तर सर्वसाधारण जागेकरिता केशव काकड व ज्ञानेश्वर शिरसाट यांच्यात सामना होणार आहे. प्रभाग क्र. 3 मध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव जागेवर प्रमिला आव्हाड, द्रौपदा पानसरे व सीमा शिंदे असे तीन उमेदवार आहेत. प्रभाग क्र. 4 मध्ये अनुसूचित जमातीकरिता राखीव जागेवर मच्छिंद्र जाधव व अनिल सोंगाळ तसेच सर्वसाधारण जागेवर मोहन आव्हाड व बबन काकड यांच्यात सामना रंगणार आहे. प्रभाग क्र. 5 मध्ये अनुसूचित जमातीकरिता राखीव जागेवर सोपान गुंड व नामदेव फोडसे, तर ओबीसी जागेवर कचरू गाडेकर व विलास मोरे यांनी शड्डू ठोकले आहे.

कीर्तांगळी : दुरंगी लढत रंगतदार
कीर्तांगळी ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव आहे. कुसुम शांताराम चव्हाणके व कांताबाई संपत चव्हाणके यांच्यात चुरशीचा होईल. प्रभाग 1 मध्ये सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव जागेवर आशा चव्हाणके, सोनाली चव्हाणके यांच्यात तर सर्वसाधारण जागेकरिता बाळासाहेब घुले, योगेश घुले, रंगनाथ चव्हाणके व संतोष चव्हाणके असे लढतीचे चित्र आहे. प्रभाग 2 मध्ये सर्वसाधारण स्त्रियांसाठी 2 जागा राखीव असून उज्ज्वला चव्हाणके, कविता चव्हाणके, निर्मला चव्हाणके, सुनीता चव्हाणके यांनी दावा केला आहे. सर्वसाधारण जागेकरिता लक्ष्मण चव्हाणके व विशाल चव्हाणके यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग 3 मध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव जागेवर कांचन गोसावी, सुनीता चव्हाणके, रोहिणी चव्हाणके, विमल चव्हाणके, तर सर्वसाधारण जागेकरिता विवेक चव्हाणके व दिलीप चव्हाणके यांच्यात चुरशीच्या लढतीची चिन्हे आहेत.

लोणारवाडी : माजी सरपंचांच्या सौभाग्यवतींची स्पर्धा
लोणारवाडी (शास्त्रीनगर) ग्रामपंचायतचे सरपंचपद सर्वसाधारण स्त्री राखीव असून, मावळते सरपंच सदाशिव लोणारे यांच्या सौभाग्यवती जयश्री व समता परिषदेचे कार्यकर्ते राजेंद्र भगत यांच्या सौभाग्यवती संध्या यांच्यात सरळ लढत होत आहे. प्रभाग क्र. 1 मध्ये अनुसूचितजमातीच्या स्त्रीकरिता राखीव जागेकरिता पंचायत समितीच्या माजी सभापती सुमन बर्डे व सुमन मोरे यांच्यात सामना होत आहे. ओबीसी महिला राखीव जागेकरिता सुप्रिया पगर व प्रतिभा लोणारे यांच्यात लढाई होत आहे. सर्वसाधारण जागेवर माजी सरपंच कैलास गोळेसर व ज्ञानेश्वर लोणारे आमनेसामने आहेत. प्रभाग क्र. 2 मध्ये सर्वसाधारण स्त्री करिता राखीव जागेवर चित्रा भगत व अर्चना पाचोरे, तर सर्वसाधारण जागेवर योगेश लोणारे व श्रीपाद लोणारे यांचा कस लागणार आहे. प्रभाग क्र. 3 मध्ये सर्वसाधारण स्त्री करिता पूनम बोर्‍हाडे, कुसुमबाई माळी व संगीता माळी यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे.

वडगाव पिंगळा : सात कारभारणी सरसावल्या
वडगाव पिंगळा ही ग्रामपंचायत संवेदनशील म्हणून ओळखली जाते. येथील सरपंचपद सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव असून अर्धा डझनपेक्षा जास्त उमेदवार शर्यतीत असल्याने चुरशीचा सामना होणार आहे. सरपंचपदासाठी सुशीला सानप, वेणूबाई हुल्लुळे, शेवंताबाई मुठाळ, सुमन मुठाळ, पूनम सानप, बेबी नागरे, ललिता हरळे यांनी निवडणुकीत रंगत निर्माण केली आहे. प्रभाग क्र. 1 मध्ये सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव जागेकरिता मनीषा शिंदे, वैभवी मुठाळ, गायश्री मुठाळ, सुनंदा मुठाळ, सुमन मुठाळ, बेबी नागरे, कमल सानप, तर सर्वसाधारण जागेकरिता सुनील मुठाळ, सुदर्शन मुठाळ, रवींद्र मुठाळ, दिलीप मुठाळ, धीरज मुठाळ, जितेंद्र मुठाळ, अमोल सानप व समाधान नागरे यांच्यात लढत होत आहे. प्रभाग क्र. 2 मध्ये अनु. जमातीच्या स्त्रीकरिता राखीव जागेवर बिजलाबाई पवार, अलका सोनवणे, शांता माळी तर ओबीसी स्त्रीकरिता राखीव जागेवर बबाबाई सानप, शारदा सांगळे, तसेच सर्वसाधारण जागेकरिता सुदाम सानप, जितेंद्र सानप व महेश लांडगे असा सामना रंगणार आहे. प्रभाग क्र. 3 मध्ये सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव जागेवर इंदूबाई सानप, विठाबाई विंचू, सीमा सानप, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता खुल्या जागेवर संतू हुल्लुळे, खंडेराम विंचू, बबन विंचू, संजय सानप अशी लढत राहणार आहे. प्रभाग क्र. 4 मध्ये अनु. जातीच्या स्त्रीकरिता राखीव जागेवर मोहिनी अभंग, मंदा भवार व सविता भवार तसेच ओबीसी प्रभागाकरिता राखीव जागेवर गोकुळ मुठाळ, नीलेश मुठाळ, तर सर्वसाधारण जागेकरिता सचिन मुठाळ व पंढरीनाथ मुठाळ यांचा सामना रंगणार आहे.

शहा : दहा जणांची माघार; तरीही सहा रिंगणात
शहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपद सर्वसाधारण प्रभागाकरिता खुले असून येथे बहुरंगी लढत रंगणार आहे. थेट सरपंचपद पदाकरिता रामनाथ नारायण कलंत्री, विष्णू जाधव, संभाजी जाधव, बाळासाहेब जाधव, मच्छिंद्र आदिक व संतोष जाधव असे सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रभाग क्र. 1 मध्ये ओबीसी स्त्रीकरिता राखीव जागेवर पूनम कडवे, संगीता कोकणे व प्रतीक्षा जाधव यांच्यात, तर सर्वसाधारण जागेकरिता शरद गंधाके, संजय गंधाके, नीलेश म्हस्के व दीपक सुडके यांचा सामना होणार आहे. प्रभाग क्र. 2 मध्ये सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव जागेवर छाया गोराणे, नंदा नाजगड, नंदाबाई श्रावण नाजगड, हिरा नाजगड, जिजाबाई वाघचौरे, रोहिणी वाघचौरे तर सर्वसाधारण जागेकरीता गंगाधर जाधव, रमेश जाधव व राजेंद्र वाघचौरे आमनेसामने ठाकले आहेत. प्रभाग क्र. 3 मध्ये अनु. जमाती व सर्वसाधारण स्त्री अशा दोन जागा राखीव आहेत. त्यात जगन गोधडे, रोहित जाधव व जिजाराम पवार यांच्यात तसेच अनिता गोराणे, शीतल बहिरट व प्रमिला जाधव यांच्यात तिरंगी सामना होत आहे. सर्वसाधारण प्रवर्गाच्या एका जागेकरिता गणेश जाधव व गोपाळ बुब यांच्यात सरळ लढत होत आहे. प्रभाग क्र. 4 मध्ये अनुसूचित जातीच्या स्त्रीकरिता राखीव जागेवर पल्लवी घोडेराव, लता घोडेराव, अनिता जाधव यांच्यात तर सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव जागेकरिता आचल जाधव, सुमनबाई भवर व सविता देवकर यांच्यात लढत होत आहे. ओबीसी राखीव जागेकरिता सोपान रहाणे, गोरक्ष सैदर व रावसाहेब वाणी यांची लढत आहे. येथील सरपंचपदासाठी 16 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. माघारीच्या मुदतीत मावळत्या सरपंच शुभांगी जाधव यांच्यासह शरद नाजगड, नंदा जाधव, दत्तात्रेय आदिक, कैलास श्रीमंत, संदीप बहिरट, बाळासाहेब जाधव, नवनाथ वाकचौरे, विजय गंधाके व अशोक जाधव अशा 10 जणांनी माघार घेतली. तरीदेखील थेट सरपंचपदाकरिता सहा उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने चुरशीच्या लढतीची चिन्हे आहेत.

सायाळे : शिंदे – शेंडगे आमने सामने
सायाळे ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदासाठी सरळ लढत होत आहे. अतुल शिंदे व विकास शेंडगे यांनी एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. प्रभाग क्र. 1 मध्ये अनुसूचित जातीच्या महिलेकरीता राखीव असलेल्या जागेवर मीराबाई जारे व साधनाबाई जारे तसेच सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव जागेकरिता नंदाबाई शिंदे व राजूबाई शिंदे यांच्या, तर सर्वसाधारण जागेसाठी विजय लांडगे व सोमनाथ लांडगे यांच्यात लढत होत आहे. प्रभाग क्र. 2 मध्ये अनु. जातीच्या जागेकरिता फुलचंद जाधव, भगवान लोहकरे, सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव जागेवर पल्लवी वर्पे व सविताबाई शिंदे, तर सर्वसाधारण जागेसाठी कालिदास हाके व पोपट हाके यांच्यात लढत होत आहे. प्रभाग क्र. 3 मध्ये सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव असलेल्या एका जागेकरिता तिरंगी लढत आहेत. जया गोरे, भारती जारे व सविता गोरे यांनी एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. याच प्रभागातील सर्वसाधारण जागेकरिता अशोक चासकर व सोमनाथ चासकर यांच्यात लढत होत आहे.

पाटपिंप्री : गायकवाड विरुद्ध गायकवाड लढत
पाटपिंप्री ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या स्त्रीकरिता राखीव असून येथे अर्चना गायकवाड व नंदा गायकवाड यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. प्रभाग क्र. 1 मध्ये अनुसूचित जमातीच्या स्त्रीकरिता राखीव जागेवर निर्मला बर्डे व सरला भुते, तर सर्वसाधारण जागेवर दिलीप उगले, सोमनाथ उगले व बारकू ताकाटे यांच्यात लढत होत आहे. प्रभाग क्र. 2 मध्ये सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव जागेसाठी ज्योती उगले, मनीषा सोमनाथ उगले, मनीषा भगवान उगले, सुमन भालेराव, सुमन रामनाथ उगले, सुमन रावसाहेब उगले यांच्यात लढत होत आहे. सर्वसाधारण जागेकरिता विजय वाळुंज, सचिन वाळुंज व सुरेश हिंगे यांनी चुरस निर्माण केली आहे. प्रभाग क्र. 3 मध्ये सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव जागेवर शकुंतला उगले, ज्योती उगले, विद्या उगले, योगिता सातपुते यांच्यात लढत होत आहे. सर्वधारण जागेवर महेश उगले व गोरक्षनाथ उगले यांनी शड्डू ठोकले आहेत.

डुबेरेवाडी : नऊ बिनविरोध; सरपंचपदासाठी रण
डुबेरेवाडी (कृष्णनगर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दत्तू गोफणे, शिवाजी वारुंगसे व भाऊराव सदगीर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. सरपंचपदासह नऊ जागांसाठी निवडणुक जाहीर झाली आहे. मात्र सर्व नऊ जागा बिनविरोध झाल्या आहे. त्यात प्रभाग क्र. 1 मधून संतोष काशीनाथ सदगीर, शैला रंगनाथ पवार, योजना महिंद्र सदगीर, प्रभाग क्र. 2 मधून सविता शंकर वारुंगसे, राजाराम लक्ष्मण वारुंगसे व गणपत ज्ञानेश्वर उघडे तर प्रभाग क्र. 3 मधून जनाबाई शांताबाई लेहकर, सोनाली शरद गोफणे आणि बस्तीराम एकनाथ गुळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. केवळ सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या गोफणे, वारुंगसे व सदगीर यांच्यात एकमत न झाल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.

आशापूर : तिरंगी सामना; चार सदस्य बिनविरोध
आशापूर (टेंभूरवाडी) ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव असून तिरंगी सामन्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात सुलोचना पाटोळे, द्रौपदा पाटोळे व चांगुणा पाटोळे यांचा समावेश आहे. प्रभाग क्र. 1 व 2 मधील सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव जागेवर निकिता संतोष पाटोळे, मनीषा संतोष पाटोळे व इंदू परशराम पाटोळे तसेच ओबीसी प्रवर्गामध्ये नवनाथ पाटोळे, अशोक पाटोळे व सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव जागेवर सुलोचन दत्तात्रेय पाटोळे व मीना पोपट पोटे यांच्यात सामना रंगणार आहे. या ग्रामपंचायती प्रभाग क्र. 2 मधील सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री अशा दोन जागांवर अनुक्रमे दत्तू मधुकर पालवे, सुनीता सुनील पाटोळे, तर प्रभाग क्र. 3 मध्ये सर्वसाधारण प्रवर्ग व ओबीसी स्त्री राखीव जागेवर अनुक्रमे ज्योत्स्ना सोमनाथ पाटोळे व सुनंदा बाळासाहेब पाटोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत निवडणूका : कुठे सरळ तर कुठे बहुरंगी लढत appeared first on पुढारी.