जखमी मोरावर पिंपळनेरला उपचार; देखरेखीसाठी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या ताब्यात

पिंपळनेर मोर www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील बोपखेल पैकी उंबऱ्यामाळ जंगलात गावातील काही नागरिकांना एक मोर पक्षी जखमी अवस्थेत आढळला. मोराची अन्य प्राण्यांकडून अथवा कुत्र्यांकडून शिकार होऊ नये म्हणून नागरिकांनी तत्परता दाखवत मोराला पिंपळनेर वन विभाग येथे आणण्यात आले.

पिंपळनेर वनविभागाचा कर्मचाऱ्यांनी मोराची तपासणी केली असता मोराच्या पंखाला गंभीर जखम दिसून आली.वन विभागाने याची माहिती पिंपळनेर येथील वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांना दिली व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोराला पिंपळनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मोरावर उपचार करून पुढील देखरेखीसाठी वन्यजीव संरक्षण संस्थेकडे सोपविण्यात आले. मोर पूर्णपणे उडण्यास सक्षम झाल्यावर त्याला वन विभाग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, असे वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी सांगितले.या वेळी उंबऱ्यामाळ येथील डॅनियल लाशा वळवी, जीवन भाऊराव कुवर, विनायक सोनू वळवी,रमेश हान्या कुवर,पिंपळनेर वन विभागाचे वनक्षेत्रपाल ज्ञानोबा अडकिने, वनपाल संदीप मंडलिक, आर. व्ही. पाटील, वनरक्षक योगेश भिल, वन्यजीव संरक्षण संस्थेचे प्रमोद गायकवाड व दानिश पटेल आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post जखमी मोरावर पिंपळनेरला उपचार; देखरेखीसाठी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या ताब्यात appeared first on पुढारी.