जळगावला तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शेतजमीन नावावर करून देण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या तलाठी व कोतवालास रंगेहात अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सूर्यभान काळे (५०, रा. शिवशक्तिनगर, भडगाव रोड, चाळीसगाव) असे तलाठ्याचे तर किशोर गुलाबराव चव्हाण (३७, रा. श्रीकृष्णनगर, चाळीसगाव) असे या लाचखोर कोतवालाचे नाव आहे.

बोरखेडा (बु.) येथील ४२ वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांनी मृत्युपत्र केले असून, त्यानुसार तक्रारदाराच्या नावे शेतजमीन करण्यात आलेली आहे. त्यांच्या हिश्श्यावर एकूण तीन गट वाटणीस आले आहेत. तीन गटांपैकी ६४/२ ही शेतजमीन तक्रारदार यांना त्यांची पत्नी प्रतिभा पाटील यांच्या नावावर करायची होती. त्यासाठी त्यांनी नोव्हेंबर-२०२१ मध्ये तलाठी काळे यांच्याकडे प्रकरण सादर केले होते. त्यावेळी काळे यांनी सात हजार रुपये लाच घेतली होती. त्यानंतरही त्यांनी काम न केल्याने तक्रारदाराने ९ फेब्रुवारीला तलाठी कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पुन्हा सात हजारांची मागणी केली. त्यापैकी पाच हजारांची लाच घेताना गुरुवारी (दि. २३) तलाठी व कोतवाल यांना अटक करण्यात आली. संशयितांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post जळगावला तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.