जळगावात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विजेचा धक्का
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील कालिका माता मंदीर परिसरात बुधवारी २१ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत शहरातील शाहूनगर भागातील रहिवासी शेख समीर शेख राज मोहम्मद (२२) या तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण खेडी शिवारातील कालिका माता मंदीर परिसरात आशुतोष पाटील यांच्याकडे बांधकामाचे काम करीत होता. बुधवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजता बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या बोरींगच्या वायरचा स्पर्श झाल्याने शेख समीर याला जोरदार वीजेचा धक्का बसला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरीक व बांधकाम करणारे कामगारांनी धाव घेत वीजपुरवठा बंद करून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तरुणास मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा रुग्णालयात संतप्त नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम होते. शेख समीर याच्या पश्चात आई, भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा:

The post जळगावात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.