जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर

जिल्हा दूध संघ www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा निकाल हाती आले आहेत.  या निकालामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला असून जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाने विजयश्री मिळवली. त्यामुळे खडसे यांच्या ताब्यातील एकमेव संस्था देखील ताब्यातून निसटली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि.10) मतदान झाले. राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी समजले जाणारे एकनाथ खडसे व गिरीश महाजन या दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. रविवारी (दि.11) या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यात खडसे यांना मोठा धक्का बसला असून एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा देखील पराभव झाला आहे.

एक जागा बिनविरोध…
जिल्हा दूध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे. यात एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार असून यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले. त्यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. तर एकूण ४४१ मतदार असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर शनिवारी (दि.10) सर्वच्या सर्व मतदारांनी हक्क बजावला होता.

मतांचे पारडे याप्रमाणे….
मुक्ताईनगर मतदार संघ: आ. मंगेश चव्हाण (विजयी- २५५), मंदाकिनी खडसे ( १७९)
जामनेर मतदार संघ: मंत्री गिरीश महाजन (विजयी- २७६), दिनेश पाटील (१५८)
पारोळा मतदार संघ : आ.चिमणराव पाटील (विजयी- २२७), सतीश अप्पा ( २०८)
रावेर मतदार संघ : जगदीश बढे (१७०) ठकसेन पाटील (विजयी २६६)
जळगाव मतदार संघ : मालती महाजन (१६२), गुलाबराव पाटील (विजयी- २७२)
एरंडोल मतदार संघ : दगडू चौधरी (विजयी- २३०), अमर जैन ( २०५)
भडगाव मतदार संघ : रावसाहेब भोसले (विजयी – २३३), डॉ. संजीव पाटील (२००)
भुसावळ मतदार संघ : शामल झांबरे (विजयी- २६३), शालिनी ढाके (१६९)
बोदवड मतदार संघ : ॲड. रवींद्रपाटील (२१६), मधुकर राणे (विजयी- २२०)
चाळीसगाव मतदार संघ : प्रमोद पाटील (विजयी- २४७), सुभाष पाटील (१८८)
चोपडा मतदार संघ : इंदिराबाई पाटील ( १६४), रोहित निकम (विजयी – २६९)
धरणगाव मतदार संघ : वाल्मिक पाटील (१६७), संजय पवार (विजयी- २६९)
अमळनेर मतदार संघ : आ. अनिल पाटील (विजयी- २४६), स्मिता वाघ (१८४)
यावल मतदार संघ : हेमराज चौधरी (१६८), नितीन चौधरी (विजयी- २६०)

महिला राखीव मतदार संघ: देवकर छाया गुलाबराव (विजयी २३५), पाटील पूनम प्रशांत (विजयी २५७), पाटील सुनिता राजेंद्र (१९२), पाटील उषाबाई विश्वासराव (०),सूर्यवंशी मनीषा अनंतराव (१६४), ९ मते अवैध.

अनु जाती जमाती : ब्रम्हे श्रावण (१६१), आ. संजय सावकारे (विजयी- २७६)
वि.जा.भ.ज.वि.मा.प्र. : विजय पाटील (१७९), अरविंद देशमुख (विजयी- २५९)
इ.मा.व : गोपाळ भंगाळे (२०७), पराग मोरे (विजयी- २३०).

हेही वाचा:

The post जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर appeared first on पुढारी.