Nashik : नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व

नांदगाव तालुका,www.pudhari.news

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव तहसील कार्यालयात निकालांच्या चार फेरीत मतमोजणी पार पडली. १२ थेट सरपंचपदाचे व  ८७ ग्रामपंचायत सदस्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. तर शास्त्रीनगर, नवसारी, कसाबखेडा येथील सरपंच निवड बिनविरोध झाली होती. असे एकूण १५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाले. या निकालात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला असून मतदारांनी नवोदितांना संधी दिली आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले आहे.

तालुक्यातील लक्ष्य लागून असलेल्या नागापूर, मुळडोंगरी, ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन झाले. आमदार कांदे यांचे निकटवर्तीय असलेले मुळडोंगरी येथील आमोल नावंदर यांना देखील पराभवाचा धक्का बसला. माजी सभापती सुभाष कुटे यांच्या नेतृत्वाखाली तळवाडे ग्रामपंचायत मध्ये आपली सत्ता कायम ठेवली तर नागापूर येथील ग्रामपंचायतीवर माजी जिल्हापरिषद सदस्य राजाभाऊ पवार यांनी निवडणूक जिंकत आपल्या हाती सत्ता घेतली आहे.

निवडणुकीच्या निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात एकच गर्दी केली होती. निकाल समोर येताच गुलालाची उधळण करत कार्यकर्तांनी एकच जल्लोष केला.

थेट जनतेतून निवडलेले सरपंच पुढील प्रमाणे

● बोयेगाव – बबन पोपट शेरमाळे ४३५ (शिंदे गट)
●लोढरे -ज्योती प्रमोद निकम ६७३ (शिंदे गट)
● हिरेनगर – मंगला श्रावण बिन्नर २८५ (शिंदे गट)
●धोटाने खुर्द – शरद अशोक काळे
२३३ (शिंदे गट)
● लक्ष्मीनगर – मीराबाई शंकर उगले ५३२ (शिंदे गट)
●भार्डी – अनिता अशोक मार्कंड ३३४ (शिंदे गट)
●हिसवळ बु.- शांताराम विठ्ठल पवार ६६२ (शिंदे गट)
●मूळडोंगरी – जन्याबाई सुरेश पवार ८८७
●धनेर – मनीषा सुभाष वाघ ३५२ (शिंदे गट)
●तळवाडे शीतल प्रल्हाद निकम ९०५ (शिंदे गट)
● नागापूर – राजेंद्र सयाजी पवार ९०७ (शिंदे गट)
●पिंपरखेड – मंजुषा जीवन गरुड १३८० (शिंदे गट)

बिनविरोध झालेले सरपंच –
●कसाबखेडा – सुनीता कांतीलाल चव्हाण (शिंदे गट)
●नवसारी – अशोक कारभारी वऱ्यगळ (शिंदे गट)
●शास्त्रीनगर – भिका ठका बिन्नर (शिंदे गट)

The post Nashik : नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व appeared first on पुढारी.