जळगाव : रक्षाताईंचा मोठेपणा… पण राजकारणात येण्याचा मानस नाही

रक्षा खडसे, जनार्दन महाराज www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी रावेर मतदारसंघात भाजपकडून जनार्दन महाराज यांच्या नावाची चाचपणी केली जात असल्याची चर्चा आहे. नुकतेच यावल तालुक्यात समरता कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातील संतांनी हजेरी लावली होती. त्यामुळे खासदार रक्षा खडसे यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देत, आज महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धार्मिक, सामाजिक कार्यात जनार्दन हरीजी महाराजांचे योगदान असून त्यांच्याविषयी अधिक माहिती अशी…

सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे आश्रम यावल तालुक्यातील फैजपूर येथे आहे. अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. अयोध्या राम मंदिरांसाठी त्यांनी वेळोवेळी सहभाग घेतला असून, जळगाव जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेषत: यावल, रावेर, भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यात त्यांचे भक्त अधिक संख्येत आहेत. सतपंथ संस्थानच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक कार्यात महाराजांचे नेहमीच योगदान असते. लोकसभा निवडणुकीसाठी रावेर मतदारसंघात भाजपकडून जनार्दन महाराज यांच्या नावाची चाचपणी केली जात असल्याची चर्चा आहे. नुकतेच यावल तालुक्यात समरता कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातील संतांनी हजेरी लावली होती. त्यामुळे खासदार रक्षा खडसे यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देत, आज महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेतून समाजाची सेवा करणार….

जनार्दन महाराज “मी धार्मिक नेतृत्व करतोय, त्यात आनंदी असून, राजकारणात येण्याचा माझा कुठलाही मानस नाही. आम्ही ज्या तत्त्वांशी बांधील आहोत, त्यात राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेत राहून काम करण्याचा निर्धार केला आहे. धर्मकार्य करणे हीच माझी भूमिका आहे. राजकारणात काही मर्यादा येतात. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात नेतृत्व करत असून, यातूनच समाजहिताचे कार्य सुरू राहणार. रक्षाताईंचा मोठेपणा आहे की, त्यांनी मला सर्मथन केले. मात्र, माझा राजकारणात जाण्याचा माझा विचार नाही. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या समन्वयातून लोकहिताला प्राधान्य दिले जाणार असल्याचे जनार्दन महाराज म्हणाले.

हेही वाचा:

The post जळगाव : रक्षाताईंचा मोठेपणा... पण राजकारणात येण्याचा मानस नाही appeared first on पुढारी.