जळगाव : विज्ञान दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलमध्ये उपयुक्त प्रोजेक्टचे सादरीकरण

विज्ञान दिन www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ५ वी ते ८ व्या इयत्तेसह सर्व विद्यार्थ्यांनी ३७ प्रोजेक्ट साकारले आहेत. समाज हितासाठी उपयुक्त असलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानिमित्त स्वयंप्रेरणेतून प्रोजेक्टच्या संकल्पनांवर काम केले. यात विज्ञान, तंत्रज्ञान, आर्टिफिशीयल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, केमिस्ट्री, बायोलॉजी, भौतिकशास्त्र, अवकाश तंत्रज्ञान, रोबोटिक्स, थ्री डी प्रिंटींगसह अन्य विषयांवर प्रोजेक्ट साकारण्यात आले आहेत.

अनुभूती निवासी स्कूलमधील असेंम्बली हॉलमध्ये हे प्रोजेक्ट ठेवण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज (ता. २८) ला जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते फित सोडून आणि दीपप्रज्वलनाद्वारे करण्यात आले. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, अभंग जैन उपस्थित होते. दोन दिवस होणाऱ्या या प्रोजेक्ट सादरीकरणात इतर शाळांसाठी ‘सायन्स क्विझ’ आयोजित केली आहे.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘अनुभूती इनोव्हेशन’ सेंटर असून रोबोटिक लॅब सह आर्टिफियल तंत्रज्ञानासहन विद्यार्थांमध्ये संशोधात्मक वृत्तीला चालना मिळावी यासाठी प्रयत्न केले जाते आहेत. वर्षभरात चांद्रयान-३, भूमिती व गणितीय प्रोजेक्ट, मायक्रोबॉयॉलाजी, मेडिकल टेक्नोलॉजी, इलेक्ट्रोेमॅग्रेटीक लिफ्टचे उपकरण यासह विज्ञानावर आधारित विविध मॉडेल, प्रोजेक्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारतात. यात विद्यार्थी अत्याधुनिक विज्ञानावर आधारित उपकरणे, मॉडेल, प्रोजेक्ट तयार करत असतात. यावर्षी ३७ निरनिराळ्या प्रकारचे विज्ञान प्रोजेक्ट साकारलेले आहेत. विशेष उल्लेखनीय असे की, ड्रोन टेक्नॉलॉजी, बायोफर्टिलायझर, बेसिक रोबोटिक्स, सोलर ट्रॅकिंग सिस्टीम्स, अंतराळ विज्ञान यांचा समावेश होता. यासोबतच पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, गणित, इंजिनेअरिंग, कॉम्प्युटर, रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित हे प्रोजेक्ट होते.

हेही वाचा :

The post जळगाव : विज्ञान दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलमध्ये उपयुक्त प्रोजेक्टचे सादरीकरण appeared first on पुढारी.