जळगाव : शेतात गुप्तधन काढायला गेले अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात

चाळीसगाव न्यूज, www.pudhari.news

जळगाव : आषाढी अमावस्या असल्याने शेत शिवारात जादूटोणा करत गुप्तधन शोधणाऱ्या टोळीचा चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. एका शेतात पडीत घरात हा अघोरी प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत ९ जणांना ताब्यात घेतले. त्यांचेकडील मोबाईल, कार आणि अघोरी पूजा करण्याचे साहित्य असा एकूण ८ लाख ३५ हजारांचा मु्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील शेतातील पडीत घरात काही व्यक्ती आषाढ आमावस्या असल्याने आघोरी पुजा करणार असल्याची गोपनिय माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.कॉ. पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली. यावेळी काही लोक गोलाकार बसुन, त्यामध्ये मानवी खोपडी, लिंबु, नारळ, रुद्राक्ष माळ, देवाची पितळी मुर्ती, पिवळया धातुचा नाग, पत्रावरील छापील देव, कंदमुळे, गोलाकार पितळी धातुचे बेरकंगण, केशरी शेदुर, आगरबत्ती पुडा, लोखंडी आडकीत्ता व कापुराची पुजा मांडुन बसले होते. गुप्त धनाकरीता अघोरी कृत्य करुन जादुटोणा करणार्‍या ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी यांना केली अटक

लक्ष्मण शामराव जाधव (वय- ४५ वर्ष रा. खडकी बायपास ता. चाळीसगांव जि.जळगाव), शेख सलीम कुतुबुददीन शेख (वय- ५६ वर्ष रा. हजरत अली चौक नागद रोड चाळीसगांव जि.जळगाव), अरूण कृष्णा जाधव (वय ४२ वर्ष रा.आसरबारी ता.पेठ जि.नाशिक), विजय चिंतामन बागुल (वय-३२, वर्ष रा. जेल रोड नाशिक), राहुल गोपाल याज्ञीक (वय-२६, वर्ष रा. ननाशी ता.दिंडोरी जि.नाशिक), अंकुश तुळशीदास गवळी (वय २१ वर्ष रा. जोरपाडा ता. दिंडोरी जि.नाशिक), संतोष नामदेव वाघचौरे (वय ४२ वर्ष रा.अशोकनगर नाशिक), कमलाकर नामदेव उशीरे (वय ४७ वर्ष रा.गणेशपुर पिंप्री ता.चाळीसगाव जि.जळगाव), संतोष अर्जुन बाविस्कर (वय-३८, वर्ष रा.अंतुर्ली (कासोदा) ता.एरंडोल जि.जळगाव) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोकॉ पवन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सागर ढिकले व पोकॉ प्रकाश पाटील हे करीत आहेत.

हेही वाचा : 

The post जळगाव : शेतात गुप्तधन काढायला गेले अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.