जळगाव : हतनूरचे दहा दरवाजे उघडल्याने तापीच्या पातळीत वाढ; प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा

हतनुर धरणाचे दरवाजे उघडले,www.pudhari.news

जळगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याची आवक वाढली असून, धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहे. हे दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात १९, ७७९ क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे.

भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गुरुवारी सकाळी ६ वाजता धरणाचे १० दरवाजे प्रत्येकी एका मीटरने उघडण्यात आले. यामुळे १९,७७९ क्यूसेस वेगाने विसर्ग तापी नदीपात्रात होत आहे. त्यामुळे तापी नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. तापी नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने कोणीही तापी नदीपात्रात जाऊ नये, तसेच गुरेढोरे नदीच्या पात्रात सोडू नये, आवश्यक खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

The post जळगाव : हतनूरचे दहा दरवाजे उघडल्याने तापीच्या पातळीत वाढ; प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा appeared first on पुढारी.