जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने, रास्ता रोको

nashik protest

नाशिक, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करणार्‍या सरकार व पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात आज (दि. ३) ठिकठिकाणी रास्ता रोको, आंदोलन, मोर्चा, बंद, निदर्शने करण्यात आली. (Nashik Protest)

 चांदवड तालुका सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा

चांदवड शहरातील व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवली. संपूर्ण शहरात शुकशुकाट पसरला होता. जन आक्रोश मोर्चानिमित्त शहरात अतिरिक्त पोलीस फोर्स बोलवण्यात आल्याने पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

Nashik Protest : सकल मराठा समाजाच्या वतीने अंदरसुल येथे चक्काजाम

अंदरसुल येथील सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अंदरसुल गाव बंद ठेवण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख झुंजारराव देशमुख, उपसरपंच संजय ढोले, डॉ संकेत शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, योगेश खैरनार, काकासाहेब देशमुख ,बाळासाहेब जनार्धन पागिरे, दिनेश पागिरे, नंदकिशोर धनगे, संतोष वलटे, अमोल सोनवणे, प्रमोद देशमुख, महेश देशमुख, तेजराज जहागीरदार, सोपान आवटे, शिवाजीराजे वडाळकर, जनार्दन जानराव, दत्तात्रय थोरात, अण्णासाहेब ढोले, अमोल आहेर, दत्तात्रेय हाडोळे, शंकरराव गायकवाड, गणपतराव देशमुख आदी उपस्थित होते.

कळवण येथे कडकडीत बंद

सकल मराठा समाजाच्या वतीने रॉली कडून व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर कळवण शहर कडकडीत बंद पाळण्यात आले.

वणीत मराठा महासंघ, सकल मराठा समाज, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

वणी येथे वणी – सापुतारा महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वणी पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश बोडखे यांना निवेदन दिले. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदिप जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रशांत कड, बाळासाहेब घडवजे, विलास कड, गंगाधर निखाडे, विलास निरघुडे, योगेश बर्डे, वसंत कावळे, नितीन शेळके, जितेंद्र शिरसाठ, जमीर शेख, नामदेव घडवजे, दिलीप देशमुख, मनोज थोरात, उत्तम जाधव आदी उपस्थित होते.

Nashik Protest : देवळा येथे महाविकास आघाडीच्या वतीने निषेध

महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. सपोनि दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, विजय पगार, सुनील आहेर, संतोष शिंदे, दिलीप आहेर, जगदिश पवार, दिलीप आहेर, चंद्रकांत आहेर, बापू देवरे, पिनू निकम, धनंजय बोरसे, दिनेश आहिरे, विलास आहेर, दुर्गेश निकम, शिवसेनेचे विजय जगताप, विलास शिंदे, दादाभाऊ आहेर, स्वप्नील सावंत, कडू चव्हाण, गणेश वाघ, भगवान आहिरे, रमेश निकम, खंडू खैरनार, सोमनाथ शिंदे, दिनेश अहिरे आदी उपस्थित होते. या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ४) सकल मराठा समाजाच्या वतीने देवळा शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिडकोत सकल मराठा समाज आक्रमक

जालना घटनेच्या निषेधार्थ आज नाशिक बंद ची हाक देण्यात आली होती. सिडको सकल मराठा समाजातर्फे सिडको बंदची हाक देण्यात आली होती. सिडको परिसरात बहुतांश व्यापारी यांनी व्यवहार बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. त्रिमूर्ती चौक, रायगड चौक, पवन नगर या ठिकाणी बंद पाळण्यात आला.

यावेळी नविन नाशिक सकल मराठा समाजाचे आशिष हिरे, योगेश गांगुर्डे, संजय भामरे, विजय पाटील, मुकेश शेवाळे, अभय पवार, उमेश चव्हाण, कृष्णा काळे, सुमित पगार, सागर पाटील, शुभम महाले, सागर जाधव, अर्जुन शिरसाठ, मनोज वाघ, विशाल पगार, प्रमोद  पाटील, ज्ञानेश्वर नरवडे उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा 

The post जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने, रास्ता रोको appeared first on पुढारी.