जुने नाशिकमध्ये गॅस सिलिंडरला आग, जिवितहानी नाही

सिलेंडर स्फोट www.pudhari.news

नाशिक (जुने नाशिक): पुढारी वृत्तसेवा

येथील कुंभार वाडा परीसरात मोरे कुटुंबियांच्या घरी शुक्रवार दि.27 सकाळी दहाच्या सुमारास गॅस गळतीमुळे घरगुती सिलेंडरला आग लागल्यामुळे धावपळ उडाली. परिसरातील जाधव नावाच्या व्यक्तीने अग्निशामक दलाला तत्काळ कळविल्यानंतर दोन अग्निशमन बंब तिथे दाखल झाले. अग्निशामक दलाचे फायरमॅन तिथे पोहोचतात काही मिनिटातच त्यांनी सिलेंडर मधून निघत असलेली आग आटोक्यात आणली. सिलेंडरची आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे फायरमन पोहोचण्याआधी त्यांच्यावर वाळू व कोरडे कपडे टाकण्यात आले. त्यामुळे कोरेड कपडे जळाले. सुदैवाने सिलिंडरचा विस्फोट झाला नाही. जखमी झाल्याचे वृत्त नाही.

हेही वाचा:

The post जुने नाशिकमध्ये गॅस सिलिंडरला आग, जिवितहानी नाही appeared first on पुढारी.