दिव्यांग बालनाट्य अंतिम स्पर्धेत नाशिकचे ‘रिले’ प्रथम

रिले www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या चौ‌थ्या अंतिम फेरीत महाराष्ट्र समाज सेवा संघ रचना विद्यालय, नाशिक संस्थेच्या ‘रिले’ नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. रोटरी संस्कारधाम चॅरिटेबल ट्रस्ट, गोरेगाव संस्थेच्या ‘गोदा’ नाटकाला द्वितीय, तर राजीव गांधी मेमोरिअल स्कूल फॉर ब्लाइंड, सोलापूर संस्थेच्या ‘जत्रा’ नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाले असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकावद्वारे जाहीर केली आहे.

पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमध्ये दि. १५ ते १७ मार्चदरम्यान पार पडलेल्या अंतिम फेरीत एकूण ११ नाटकांचे प्रयोग पार पडले. गिरीश भूतकर, वैशाली गोस्वामी, मंगेश दिवाण यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी कौतुक केले.

निकाल  असा…

दिग्दर्शन : प्रथम – धनंजय वाबळे (नाटक : रिले), द्वितीय – जयेश जोशी (नाटक : वारी), तृतीय – अनिकेत भोईर (नाटक : गोदा)

प्रकाशयोजना : प्रथम – कृतार्थ कन्सारा (रिले), द्वितीय – भरत मोरे (गोदा)

नेपथ्य : प्रथम -सुचिता महाले (वनराई), द्वितीय- कनिष्क बिजवे (आजोबा आणि लाल टी शर्ट)

रंगभूषा : प्रथम -विनोद देवठक (वनराई), द्वितीय – मीनाक्षी बावल (रिले)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक पुरुष : अखिलेश यादव (गोदा)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक स्त्री : क्षितिजा भावसार (रिले)

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रके : एन्जल गुप्ता (गोदा), ऋतुजा देसले (रिले), सलोनी लांडे (आजोबा आणि लाल टी शर्ट), लकी (विधी), ईश्वर कळंगुंडे (जत्रा), समर्थ डोके (रिले), ओम सुर्यवंशी (वनराई), करण पवार (देवा तुझे किती सुंदर आकाश)

हेही वाचा:

The post दिव्यांग बालनाट्य अंतिम स्पर्धेत नाशिकचे 'रिले' प्रथम appeared first on पुढारी.