धुळे : कंपनीत चोरी करणारा गजाआड

कंपनीत चोरी करणारा गजाआड,www.pudhari.newsw

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील छडवेल तसेच डोंगराळे परीसरातील सुझलॉन कंपनीत केबलची चोरी करणा-या चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

पवनचक्कीच्या टॉवरमधून 2 लाख 25 हजार रुपयांची सुमारे ४८० मिटर कॉपर केबल चोरीला गेली होती. याप्रकरणी शेख अभिद शेख रसूल रा. तिरंगा चौक, धुळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या केबलची वाहतूक ज्या ट्रक मधून केली जात होती तो ट्रकही पोलिसांनी जप्त केला. त्याच्या आणखी साथदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे साक्री, विभाग यांच्या मार्गदर्शनातून ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा :

The post धुळे : कंपनीत चोरी करणारा गजाआड appeared first on पुढारी.