धुळे क्लस्टर कार्यशाळा : भारतीय संविधानाची ओळख व्हावी- प्राचार्य डॉ. वाडेकर

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

भारतीय संविधान हा भारत देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून ज्या ग्रंथात भारतीयांच्या मूलभूत हक्क आणि कर्तव्याचा समावेश आहे. अशा भारतीय संविधानाची ओळख प्रत्येक भारतीय नागरिकांना होणे आवश्यक आहे” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आर. जी वाडेकर यांनी केले.

भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन अभियानांतर्गत धुळे क्लस्टर कार्यशाळा पत्रकार भवन येथे पार पडली. या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे उपस्थित होते. या एक दिवसीय कार्यशाळेत प्रशिक्षक बामसेफचे राष्ट्रीय संघटन सचिव संजय मोहिते यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, देशातील जनता स्वतःहून संकटे ओढवून घेत आहेत. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे बुद्धीजिवी वर्गाने शांत बसून राहणे धोक्याचे ठरेल. बुद्धिप्रामाण्यवादी वर्गाची महत्तम जबाबदारी ही आहे की, भारतीय संविधानाचे महत्त्व समस्त भारतीयांना समजावून सांगणे काळाची गरज आहे. लोकतांत्रिक भारत निर्माण करण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकांनी आयुष्य खर्ची घालण्याचे आवाहन संजय मोहिते यांनी यावेळी केले. जय वाघ यांनी सूत्रसंचलन केले तर रवि मोरे यांनी प्रास्ताविक सादर केले. डॉक्टर दिलीप लोखंडे यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. बामसेफ जिल्हा सचिव सिद्धार्थ पवार यांनी आभार मानले. धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील बामसेफ व ऑफशुट विंगच्या पदाधिकारी व संविधान प्रबोधकांनी सहभाग घेतला. धुळे क्लस्टर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रवीण खरे, संजय निकुंभे, प्रणाली मराठे, प्रज्ञा मोरे, नरेंद्र खैरनार, दादाभाऊ वाघ, मोहन मोरे, अप्पा कुवर, सुभाष पगारे, कैलास जगताप, गोरख बिरारे, संतोष नागमल, रवी सामुद्रे, रोहन मोरे, हेमकांत मोरे, विद्या मोरे, रूपाली अहिरे, पंडित निकुंबे, किशोर अहिरे, प्रा. बी. एस. मोहिते, जगदीश बोरसे, अशोक पवार आदींनी कार्यशाळा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

The post धुळे क्लस्टर कार्यशाळा : भारतीय संविधानाची ओळख व्हावी- प्राचार्य डॉ. वाडेकर appeared first on पुढारी.